‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ लवकरच झी मराठी वाहिनीवर

झी मराठीवर अनेक नवनवीन मालिका येताना दिसत आहेत. ‘देवमाणूस’ या मालिकेमद्धे सतत येणाऱ्या नवीन ट्विस्टमुळे प्रेक्षक वैतागून ही मालिका बंद करा असे म्हणत होते. आणि अखेर ही मालिका बंद होणार आणि त्याजागी नवीन मालिका सुरू होणार आहे.

अनेक नव्या मालिकेमधून जुने कलाकार आपल्या भेटीला येत आहेत. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ही नवी मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेमद्धे अभिनेत्री तितिक्षा तावडे आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तितिक्षा सोबतच अभिनेता अजिंक्य ननावरे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसंच या मालिकेत ऐश्वर्या नारकर, मुग्धा गोडबोले, रजनी वेलणकर, अजिंक्य जोशी, जयंत घाटे, राहुल मेहंदळे, हे कलाकारी महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

‘ती बोलते ते घडत नाही,जे घडणार आहे ते ती बोलते’ अशी ही सातव्या मुलीची सातवी मुलगी आणि तिची ही गोष्ट 12 सप्टेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता आपल्याला झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

Leave a Comment

Exit mobile version