रंग माझा वेगळा मालिकेतील ही जोडी आहे खऱ्या आयुष्यात देखील नवरा बायको

स्टार प्रवाह वरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत काही दिवसांपूर्वी एका जोडीची एंट्री झाली . ती जोडी म्हणजे मिस्टर अँड मिसेस आठवले या मालिकेत ही जोडी दिपाला मदत करताना आपण पाहत आहोत. मिस्टर आठवले यांची भूमिका अभिनेते शिरीष जोशी हे साकारत आहेत तर मिसेस आठवले हे पात्र अभिनेत्री ऋजुता देशमुख साकारत आहे . दिपाच्या वाईट काळात हे दोघेही दिपाला मदत करत आहेत.

तर आज आपण जाणून घेणार आहोत मिस्टर अँड मिसेस आठवले बद्दल .

अभिनेते शिरीष जोशी आणि अभिनेत्री ऋजुता देशमुख हे दोघेही ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत नवरा बायकोचे पात्र साकारत आहेत. पण फार कमी लोकांना महित आहे की हे दोघे खऱ्या आयुष्यात देखील नवरा बायको आहेत.आणि त्यांना साजिरी नावाची मुलगी देखील आहे.  

अभिनेत्री ऋजुता देशमुख हिला आपण अनेक मालिकेंमध्ये पाहिलेलं आहे. झी मराठी वरील कळत नकळत  ही तिची सगळ्यात गाजलेली मालिका होती. तिने राजा शिवछत्रपती , आभाळमाया , तु माझा सांगाती , स्वप्नांच्या पालिकडले , आणि सध्याची सोनी मराठी वरील आनंदी हे जग सारे अशा अनेक मालिकांमध्ये कामं केली आहेत तसेच रायगडाला जेव्हा जग येते हे तिचे गाजलेले नाटक आहे. मालिका नाटक यासोबतच अभिनेत्री ऋजुता देशमुख मराठी चित्रपट तुला शिकवीन चांगलाच धडा , एक गाडी बाकी अनाडी , नशीबवान आणि हिंदी चित्रपट फॅमिली यामद्धे आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर छाप पडली आहे.

तर अभिनेत्री ऋजुता देशमुख आणि अभिनेते शिरीष जोशी यांची रीयल लाइफ जोडी कशी वाटते हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा .   

.

Leave a Comment

Exit mobile version