रंग माझा वेगळा मालिकेतील कलाकारांचे खऱ्या आयुष्यातील जोडीदार पाहा.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असून टीआरपीच्या यादीतही ही मालिका अव्वल स्थानावर आहे. या मालिकेतील कलाकारांचा अभिनय देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहेत. या मालिकेतील दीपा आणि कार्तिक यांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. परंतु आज आपण या मालिकेतील कलाकारांचे रीयल लाइफ पार्टनर कोण आहेत ते पाहणार आहोत.

रंग माझा वेगळा या मालिकेत रेश्माच्या सावत्र आईची राधाई ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच अभिनेत्री पौर्णिमा तळवळकर यांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराचे नाव रोहित तळवलकर असे आहे. त्यांच्या विवाहाला १८ वर्ष पूर्ण झाली आहेत.

ललित ही भूमिका साकारणारे अभिनेते आणि दिग्दर्शक श्रीरंग देशमुख यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीचे नाव आहे सीमा देशमुख. सीमा या प्रसिद्ध मराठी नाटक, मालिका तसेच चित्रपट अभिनेत्री आहेत. श्रीरंग आणि सीमा देशमुख यांना रोहन नावाचा मुलगा आहे.

मालिकेतील सौंदर्या इनामदार ही महत्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच हर्षदा खानविलकर. हर्षदा यांनी आजवर अनेक मालिकेत वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. हर्षदा यांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार आहेत सुप्रसिद्ध दिग्दर्शक सिनेमॅटोग्राफर संजय जाधव हे आहेत. त्यांना धृती आणि मृणाल या दोन मुली आहेत.

स्टार प्रवाह वाहिनीवर ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत दिपा ही मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच रेश्मा शिंदे ही खऱ्या आयुष्यात फार वेगळी दिसते. ती साकारत असलेली दिपाची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. याआधी ती ‘नांदा सौख्य भरे’, ‘लगोरी मैत्री रिटर्न्स’, ‘चाहूल’ या मालिकेंतून प्रेक्षकांसमोर आली होती. रेश्माच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराचे नाव अभिजीत चौघुले असे आहे. 2012मध्ये या दोघांचा विवाह झाला असून अभिजीत हा पेशाने एक सिव्हिल इंजिनिअर आहे.

तर मित्रांनो यातील कोणती जोडी तुम्हाला खूप जास्त आवडली ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Tags: Real life partner of rang maza vegla actors, real life partner of rang maza vegla cast, reshma shinde husband, shrirang deshmukh wife, harshada khanvilkar husband, pournima palwalkar husband

Leave a Comment

Exit mobile version