रात्रीस खेळ चालू २ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, त्याची जागा देवमाणूस ही मालिका घेणार!

रात्रीस खेळ चले 2 या मालिकेने प्रेक्षकांचे खूपच मनोरंजन केले आहे. या मालिकेतील आण्णा आणि शेवंता यांची जोडी विशेष गाजली. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल. रात्रीस खेळ चाले 2 ही मालिका रहस्यमय कथेवर आधारित असून प्रेक्षकांना ही मालिका खिळवून ठेवते. आण्णा नाईक, शेवांता आणि नाईकांच कुटुंब याच्या अवतीभोवती ही मालिका फिरत होती. आत्ता पर्यंत या मालिकेने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे परंतु ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच समजत आहे. 29 ऑगस्ट 2020 रोजी रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होईल आणि त्यानंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल अस म्हंटल जात आहे.

या मालिकेची जागा घेणार आहे नवीन मालिका देवमाणूस. देवमाणूस या मालिकेचा पहिला प्रोमो सोशल मीडिया वर प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये एक डॉक्टर दाखवला आहे. जो आपल्या पेशंटचा जीव घेताना आपल्याला पाहायला मिळतो. डॉक्टरला आपण देवाप्रमाणे मानतो, कारण तोच आपल्याला कोणत्याही आजारातून बरा करतो. परंतु जेव्हा डॉक्टर स्वतः आपल्या पेशंट चा जीव घेतो तेव्हा काय होत हे या मालिकेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. देवमाणूस या नवीन मालिकेत अभिनेता किरण गायकवाड डॉक्टरची महत्वपूर्ण भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

रात्रीस खेळ चाले 2 ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊन त्याजागी 31 ऑगस्ट पासून देवमाणूस ही मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सोशल मीडिया वर आपल्याला प्रेक्षकांकडून काही मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. काही प्रेक्षक म्हणत आहेत की रात्रीस खेळ चाले 2 हीच मालिका पुढे चालू ठेवा, परंतु काही प्रेक्षक नवीन मालिकेसाठी खूप उत्साहित आहेत. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, रात्रीस खेळ चाले 2 हीच मालिका कंटिन्यू ठेवावी की तुम्ही पण नवीन मालिका देवमाणूस पहायला उत्सूक आहात ते कॉमेंट बॉक्स मध्ये कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद.

https://www.youtube.com/watch?v=2-dq5iOaeyc

Tags: Ratris Khel Chale 2 end, Ratris Khel Chale 2 off air soon, Devmanus zee marathi, devmanus new serial

2 thoughts on “रात्रीस खेळ चालू २ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, त्याची जागा देवमाणूस ही मालिका घेणार!”

  1. थोडे आठवडे अजून चालू रहावी, अण्णांना ह्या रुपात पहायला आवडतं आहे, आणि एकंदरीतच पहाता बरेच प्रश्न अनुत्तरित रहाणार असे वाटते आहे.

    Reply

Leave a Comment

Exit mobile version