‘रमा राघव’च्या नात्याला ‘निर्णायक वळण’ विशेष भाग – आज ३ आणि उद्या ४ ऑक्टोबर!

कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ या लोकप्रिय मालिकेचे दोन विशेष भाग आज ३ ऑक्टोबर आणि उद्या ४ ऑक्टोबरला रात्री नऊ वाजता प्रसारित होणार आहेत.


‘रमा राघव’ या मालिकेत रमा आणि राघवचे नाते एका निर्णायक वळणावर आले आहे. गणेशोत्सवा दरम्यान पुरोहित घरी राहायला आलेल्या परांजपेंच्या रमाचे,राघवसोबत असलेले नाते राघवची मामेबहीण अश्विनीमुळे उघड होते. अखेर गजानन पुरोहित गुरुजी या नात्याला संमती देतात,आता जवळपास त्यांच्या लग्नाची बोलणी सुरू झाली आहेत.

अश्यावेळेस राघवशी लग्नाची आस बाळगून असलेली अश्विनी,पुरोहितांचा कट्टर द्वेष करणारी करणारी रमाची आई लावण्या आणि अश्विनीचे वडील माधव मामा यांची युती यांचा या नात्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. एक निर्णायक वळण ‘रमा राघव’ मालिकेत आले असून ‘#रमाराघव’च्या प्रेमाचा रोमहर्षक प्रवास प्रेक्षकांना आज ३ ऑक्टोबर आणि उद्या ४ ऑक्टोबरला रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर पाहता येतील.

Leave a Comment

Exit mobile version