राजकुमार रावच्या आगामी वेब सीरिज ची सोशल मीडिया वर जोरदार चर्चा !

राजकुमार राव हा नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखला जातो. एक अष्टपैलू अभिनेता म्हणून त्याने स्वत: ची ओळख संपादन केली आहे.” स्त्री 2″, “मिस्टर अँड मिसेस माही”, आणि “श्री” यासह अनेक आगामी प्रोजेक्ट् मध्ये तो झळकणार देखील आहे. ” गन्स अँड गुलाब्स” या त्याच्या आगामी वेब सीरिज ने डिजिटल विश्वात बझ्झ निर्माण केला आहे.

प्रमोशन दरम्यान रावला त्याच्या चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. ट्रेंडिंग हॅशटॅगपासून फॅन-मेड मेम्सपर्यंत, डिजिटल लँडस्केप वर सगळीकडे ” टिपू ” च्या चर्चा आहेत.

राजकुमार रावची आगामी वेब सीरिज “गन्स अँड गुलाब्स” ही नक्कीच कमाल असणार आहे यात शंका नाही. याने डिजिटल जगात अनोखं तुफान निर्माण केलं आहे. टिपू ला भेटण्यासाठी सगळेच चाहते सज्ज झाले आहेत.

Leave a Comment

Exit mobile version