महाअंतिम सोहळ्यानंतर राधा खुडेने दिली पहिली प्रतिक्रिया

कलर्स मराठी वरील ‘सुर नवा ध्यास नवा’ या शो मध्ये महाअंतीम फेरीची विजेती ठरली ती सन्मिता धापटे शिंदे. तिला मानाची सुवर्णकट्यार मिळाली . याचबरोबर या पर्वाची २ नंबर विजेती आहे संपदा माने आणि ३ नंबर विजेती आहे राधा खुडे. राधा खुडेने सोशल मीडिया वर एक फोटो शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे ज्यात गायक महेश काळे हे सेल्फी घेत आहे आणि राधा खुडे, गायक अवधूत गुप्ते आणि अभिनेत्री तसेच या शोची सुत्रसंचालिका स्पृहा जोशी मागे उभे आहेत. तिने या फोटोला ‘सगळ्यात मोठा सन्मान हाच माझा’ असं कॅप्शन दिले आहे.

तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. आमच्यासाठी तूच या पर्वाची विनर आहेस बाकी कट्यार कोणालाही भेटली तरी काही हरकत नाही तु मनं जिंकल आहेस सर्व महाराष्ट्रच , खरी विजेती तु आहेस राधाताई , तुझा आम्हांला खुप खुप अभिमान आहे लवकरच यापुढील येणारे चित्रपटातील गाणी तुझ्यासाठी तयार आहेत. अशाचप्रकारच्या अनेक प्रतिक्रिया राधा खुडेच्या चाहत्यांनी दिल्या आहेत .

 याच सोबतच खासदार सुप्रियाताई सुळे यांनी देखील फेसबूक पोस्ट करून राधाच्या यशाबद्दल कौतुक केले आहे. त्यांनी म्हंटल आहे की, आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील वालचंदनगर , ता. इंदापूर येथील राधा खुडे या मुलीने कलर्स मराठी या वाहिनीवरील ‘सुर नवा ध्यास नवा, आशा उद्याची’ या कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वात तिसरा क्रमांक मिळवला. शरद युवा महोत्सवाच्या माध्यमातून चमकलेली ही कलाकार भावी काळात आणखी मोठी होईल हा विश्वास आहे. तिचे या यशाबद्दल खुप खुप अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.

तर तुम्हांला राधा खुडे हिने गायलेली गाणी कशी वाटली ही कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.      

Leave a Comment

Exit mobile version