देवमाणूस मालिकेतील मंजुळा बद्दल बरंच काही

झी मराठी वाहिनी वरील “देवमाणूस’’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे. मालिकेतील सर्वच कलाकार आपल्या विनोदी अभिनयातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात.

एखादी व्यक्ती आपल्याला देवसमान वाटते पण त्याचा खरा चेहरा बुरखा पांघरून घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी देवमाणूस ही मालिका. एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने भुरळ पाडतो. अल्पावधीतच गावात देवमाणूस म्हणून त्याची ख्याती पसरते. या देवमाणसाच्या बुरख्याआड एक कसा चेहरा लपला आहे याचा आपल्याला अंदाज आलाचं आहे.

या मालिकेत आता आपल्याला एक नवीन मंजुळाच पात्र दाखल होताना दिसत आहे. हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री बद्दल जरा जाणून घेऊयात…. मालिकेत नव्याने दाखल होणारे पात्र साकारले आहे अभिनेत्री “प्रतीक्षा जाधव” हिने मराठी नाटक , मालिका , चित्रपट याखेरीज हिंदी मालिका तसेच दाक्षिणात्य चित्रपटातूनही प्रतीक्षा झळकली आहे . मुळची पुण्याची असलेल्या प्रतिक्षाने कॉलेजमद्धे असताना नाटकांतून काम केले आहे . छोटी मालकीण, मोलकरीणबाई , मेंदीच्या पानावर, दिल्या घरी तू सुखी रहा या मालिका तसेच चला खेळ खेळुय दोघे, तात्या विंचू लगे रहो, जखमी पोलीस, भुताचा हनिमून, सौभाग्य माझं दैवत, खेळ आयुष्याचा हे मराठी चित्रपट तीने साकारले आहेत. दिल धुंडता है, क्राइम पेट्रोल या हिंदी मालिकेसोबत या हिंदी मालिकेसोबतच एका दाक्षिणात्य चित्रपटाचाही ती एक महत्वाचा भाग बनली आहे . अभिनयासोबतच तीला नृत्याची देखील खूप आवड आहे . तिच्या येण्याने मालिकेला नक्कीच एक वेगळे वळण लागणार आहे . प्रतीक्षाला या नव्या मालिकेनिमित्त खूप खूप शुभेच्छा . 

Tags: Pratiksha Jadhav Biography, Praiksha Jadhav Husband, Pratiksha Jadhav in devmanus

Leave a Comment

Exit mobile version