प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन लवकरच बांधणार लग्नगाठ! पोस्ट करून चाहत्यांना दिला सुखद धक्का.

प्रथमेश लघाटे हा लोकप्रिय गायक आहे. त्याचा आवाज घराघरांत पोहचलेला आहे. तो ‘सारेगमप लिटल चॅम्प्स मराठी’ या गायनाच्या कार्यक्रमाचा finalist होता. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी खुप पसंती दिली होती. सारेगमप लिटल चॅम्प्स हा कार्यक्रम आजही प्रेक्षक आठवतात. प्रथमेश सोबत आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन आणि रोहित राऊत finalist होते. हे पाचही गायक खुप लोकप्रिय आहेत.

सारेगमप लिटल चॅम्प्स हा शो आणखी एकदा चर्चेत आला आहे. चर्चेत येण्याच कारण म्हणजे प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन . प्रथमेश ने सोशल मीडिया वर एक पोस्ट केली आहे. त्याने मुग्धा सोबत एक छान असा फोटो शेअर करत आकर्षित असे कॅप्शन लिहिले आहे. आमचं ठरलंय असे कॅप्शन त्याने लिहिले आहे. त्याची पोस्ट पाहून खुप साऱ्या चर्चा रंगल्यात. अभिनेत्री स्पृहा वरद, गायिका कार्तिकी गायकवाड, अभिनेत्री सुकन्या मोने, गायिका प्रियंका बर्वे, सायली संजीव, अंकिता वालावलकर, नम्रता संभेराव, कुंजीका काळविंट, अथर्व कर्वे अशा कलाकारांनी प्रथमेश आणि मुग्धाला शुभेच्छा दिल्या आहेत.

मुग्धा आणि प्रथमेशचे चाहतेही खुप खुश आहेत. चाहत्यांनी खुप साऱ्या शुभेच्छा त्या दोघांना दिल्या आहेत.

Leave a Comment

Exit mobile version