भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज उपचारादरम्यान निधन

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले आहे. मृ्त्युसमयी ते 84 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून मुखर्जी यांची प्रकृती नाजूक होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांना 10 ऑगस्ट या दिवशी लष्कराच्या रिसर्च अॅण्ड रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्यामुळे त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मंगळवारी त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यानंतर त्यांच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा दिसली नाही. प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याचेही स्पष्ट झाले होते.

त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, यासाठी डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश येऊ शकले नाही. आज त्यांची प्राणज्योत मालवली.

Tags: Pranab Mukharjee passes away

Leave a Comment

Exit mobile version