फुलाला सुगंध मातीचा मालिकेवर पोलिस केस दाखल

स्टार प्रवाह वरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. यातील शुभम कीर्ती आणि जिजी अक्काच्या भूमिकेवर पण प्रेक्षक खुप प्रेम करतायत. पण ही मालिका सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मालिकेतील काही दृश्यांवर आक्षेप घेत , एलजीबीटीक्यु कम्युनिटीने या मालिकेविरोधात एफआयआर दाखल केल्याचे कळतेय.

‘येस वी एक्झिस्ट’ नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवरुन याबाबतची पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्ट वरुन असं कळत आहे की, या मालिकेविरोधात एफआयआर दाखल दाखल करण्यात आली आहे. पण अजूनही मालिकेच्या निर्मात्यांनी व चॅनलने यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही.

‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत शुभम म्हणजेच हर्षद आतकरी एका पाककला स्पर्धेत भाग घेतो. या स्पर्धेत वेगवेगळे स्पर्धक सहभागी होतात . यातला एक स्पर्धक ‘सॅन्डी’ हा समलैंगिक आहे. ही भूमिका अभिनेता अजिंक्य पितळे याने साकारली आहे. याच सॅन्डी आणि जिजी अक्कावर चित्रित दृश्यांवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. जिजी अक्का सॅन्डीला त्याच्या राहणीमानावरून हिणवतात , असे वागू नकोस असा सल्ला देतात . त्याला जीममध्ये जाऊन शरीर कमवण्याचाही सल्ला देतात , यावरच ‘येस वी एक्झिस्ट’ ने आक्षेप घेत एफआयआर दाखल केला आहे.   

 या संपूर्ण प्रकणावर तुमच काय मत आहे हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version