ही अभिनेत्री साकारणार नविन दिव्याची भूमिका

स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील दिव्या म्हणजेच अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर हिने ही मालिका सोडली आणि कलर्स वाहिनी वरील जीव माझा गुंतला या मालिकेत ती आता काम करत आहे हे तिने स्वतः सोशल मीडियावर सांगितले होते त्यामुळे सगळ्यांनाच महित आहे पण प्रेक्षकांमद्धे उत्सुकता होती ते दिव्याच पात्र साकारणारी अभिनेत्री नक्की कोण असेल ? तर आता ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत दिव्याची नकारात्मक भूमिका साकारणार आहे अभिनेत्री रश्मी जोशी.                             

रश्मीला याआधी आपण ‘राजा राणीची गं जोडी या मालिकेत संजीवणीच्या बहिणीच्या म्हणजेच स्वरांगीच्या भुमिकेत पहिले होते. चाहत्यांकडून प्रतीक्षाला जसा प्रतिसाद मिळत होता तसाच आता रश्मीला मिळेल का हे पुढील येणाऱ्या भागांमधून कळेलच.

तर तुम्हांला अभिनेत्री रश्मी जोशीला दिव्याच्या भूमीत पाहायला आवडेल का तुम्ही उत्सुक आहात का हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version