अभिनेत्री नेहा खान हीची देवमाणूस या मालिकेत एंट्री

देवमाणूस या मालिकेच्या माध्यमातून आपल्याला या मालिकेतील डॉक्टर त्याच्या रस्त्यात जो पण आडवा येईल त्याला संपवत असतो. नुकतंच या मालिकेत मंजुळाला मारण्यामागे सुद्धा डॉक्टरचाच हात आहे अस सरू आजी सर्वांना सांगत आहे. पोलिसांना देखील डॉक्टर वर संशय येतो परंतु ही वेळ देखील तो कशी मारून नेतो हे आपल्याला येत्या पुढच्या भागात कळेलच.

परंतु आत्ता या मालिकेत एका नवीन भूमिकेची एंट्री होणार आहे. या मालिकेच्या प्रोमो नुसार एक शहरातील मुलगी गावाकडे येताना दिसत आहे. ती खूपच मॉडर्न आहे. या मुलीचा चेहरा आपल्याला दिसत नाही परंतु ही मुलगी आहे तरी कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ही मुलगी आहे अभिनेत्री नेहा खान.

अभिनेत्री नेहा खान ही एक प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने खूप साऱ्या मराठी, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. नेहा खान हिचा शिकारी हा मराठी चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटात तिने बोल्ड भूमिका साकारली होती. आत्ता देखील ती देवमाणूस या मालिकेत एका बोल्ड आणि बिनधास्त मुलीची भूमिका साकारणार आहे. आत्ता ती इतरांप्रमाणे डॉक्टरच्या जाळ्यात फसेल की डॉक्टरचा खरा चेहरा सर्वांसमोर आणेल हे लवकरच आपल्याला येत्या भागात कळेल.

तर मित्रांनो अभिनेत्री नेहा खान हिची देवमाणूस या मालिकेत एंट्री पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

https://www.youtube.com/watch?v=5j7x92mhHNo

Tags: Neha Khan Entry in Devmanus Serial

Leave a Comment

Exit mobile version