सैराट आणि झुंड नंतर नागराज मंजुळे यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच भेटीला.

नागराज मंजुळे यांच्या सैराट या चित्रपटानंतर ‘झुंड’ हा चित्रपट चांगलाच गाजतोय. बॉक्स ऑफिसवर त्याची चांगलीच कमाई होत आहे. झुंज नंतर आता नागराज मंजुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर चित्रपट लवकरच बनवणार आहेत. या चित्रपटाचा टीजर कोरोना आधीच प्रदर्शित झाला होता. मात्र कोरोनामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकला नाही.

अभिनेता रिटेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख दोघे मिळून या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. आणि नागराज मंजुळे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. दोन वर्षांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता.तेव्हापासुनच प्रेक्षकांमद्धे या चित्रपटाबद्दल उत्सुकता होती. पण कोरोनामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकला नाही पण प्रेक्षकांची ही उत्सुकता आता लवकरच संपेल अशी आशा आहे. या चित्रपटाचे नाव ‘शिवत्रयी’ असे असुन , अजय-अतुल या चित्रपटाला संगीत देणार आहेत.

तर तुम्ही या चित्रपटासाठी उत्सुक आहात का ? हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version