मुळशी पॅटर्न फेम अभिनेत्री मालविका गायकवाड विवाह बंधनात अडकणार!

मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री मालविका गायकवाड लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. सध्या मालविकाच्या घरी लग्नाची जोरदार तयारीदेखील सुरू झाली आहे. नुकतेच मालविकाने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हळदी, मेहंदी आणि संगीत सेरेमनी चे फोटो शेअर केले आहेत.

ज्या व्यक्तीसोबत मालविका आयुष्यभराचे नाते जोडणार आहे, त्याचे नाव सिद्धार्थ सिंघवी असून, सिद्धार्थचा उल्लेख करत तिने सोशल मीडियावर काही दिवसांपासून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत #SidKiMalu असे कॅपशन तिने दिले आहे.

मालविका ही एक इंजिनिअर आहे. मालविकाने सिनेसृष्टीत येण्याआधी एका नामांकित आयटी कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी देखील केली. परंतु तिला नोकरी करण्यात फारसा रस नव्हता. निसर्गाशी जवळीकता वाढवणारी शेती तिला खुणावू लागली. मालविकाला शेती करायची खुपच इच्छा होती.

यानंतर तिने नोकरी सोडून सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाला नातेवाईक, मित्रांनी वेड्यात काढले. मात्र तिने त्या वेडालाच ध्यास बनविले. तिने स्वतःची ‘द ऑरगॅनिक कार्बन’ नावाची कंपनी देखील सुरू केली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना देखील होत आहे.

Title: Mulshi Pattern fame actress Malvika Gaekwad Marrige

Malvika Gaekwad Wedding / Marriage Photo

Tags: Malvika Gaekwad Wedding, Malvika Gaekwad Marriage, Malvika Gaikwad Wedding, Malvika Gaikwad Marriage, Mulshi Pattern actress Malvika Gaekwad Marriage, Malvika Gaikwad Husband Name, Malvika Gaekwad Lagn

Leave a Comment

Exit mobile version