माऊच्या वडिलांनी खऱ्या आयुष्यात देखील केले आहे गॅरेजमध्ये काम

स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील प्रत्तेक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. मालिकेत माऊचं साजिरी असं नामकरण झालंय. तिच्या वडिलांनी तिचा स्वीकार केल्यामुळे घरात खुप आनंदाच वातावरण आहे. यात तर साजिरीने आपल्या वडिलांच स्वप्न पुर्ण करण्यासाठी विलास ऑटोमोबाईल्स नावाने छोटंस दुकान थाटलं आहे.

साजिरीने वडिलांचं आयुष्य खऱ्या अर्थाने साजरं केलं आहे. मुलगी झाली हो मालिकेतला हा अत्यंत भावनिक प्रसंग विलास पाटील ही भूमिका साकारणाऱ्या किरण मानेंच्या खऱ्या आयुष्याची साधर्म्य साधणारा आहे. हा भावनिक प्रसंग शूट करताना किरण माने यांच्यासमोर जुन्या दिवसांचा अल्बम उलगडला. यासंबंधी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.

    संघर्षांच्या दिवसांबद्दल सांगताना किरण माने म्हणाले, “खुप वाईट दिवस होते ते भावांनो…नाटक-अभिनयाचा ‘नाद’ सोडून गुपचुप सातारला येऊन, हायवेला वाढे फाट्यावर ‘किरण ऑटोमोटिव्ह’ हे दुकान टाकून बसायला लागलं होतं. एकदिवस अचानक आधीच्या दिवसाच्या पेपरच्या रद्दीतून एक जाहिरातीच पान खाली पडले . त्या जाहिरातीत पुण्यातल्या समन्वय तर्फे सत्यदेव दुबे यांची अभिनय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे हे समजले. ती जाहिरात वाचून आपण इथे दुकानात काय करतोय असं वाटल, पुढे हे दुकान चालून काय होणार असाही विचार आला मनात . आणि थेट दुकानाला कुलूप लाऊन पुण्याला निघालो.

दुकानाला लावलेल कुलूम मी आजपर्यंत उघडल नाही. मुलगी झाली हो या मालिकेत माऊनं विलाससाठी उभ्या केलेल्या ‘विलास ऑटोमोबाईल्स’ चा सिन बघाल , तो करत असताना सतरा-अठरा वर्षापूर्वीच्या जुन्या आठवणींनी मनात गर्दी केली. तिथे असलेल्या एक कलाकाराने माझं दुकान आणि माझा प्रवास अगदी जवळून पहिला आहे. तो म्हणजे अशोकची भूमिका करणारा संतोष पाटील.’’  किरण माने यांच्या संघर्षाचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.

 तर तुम्हांला किरण मानेच्या ह्या संघर्षमय प्रवासाबद्दल की वाटत हे आम्हांला कॉमेंट्स करून  नक्की सांगा.     

Leave a Comment

Exit mobile version