माझा होशील ना मालिकेतील नयना बद्दल जाणून घ्या बरंच काही.

झी मराठी वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेतील सईची मैत्रीण ‘नयना’ हे विनोदी पात्र साकारणारी आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री मुग्धा पुराणिक हि प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. छोट्या पडद्यापासून अभिनेत्री मुग्धा पुराणिक हिने आपल्या करिअर ची सुरुवात केली.

मुग्धाचा जन्म मुंबई मधील कल्याण येथे झाला असून ती मुबईतच लहानाची मोठी झाली. तिचे शालेय शिक्षण कल्याण मधील सी. के. गोयल येथून पूर्ण झाले. आणि महाविद्यालयीन शिक्षण D G रुपारेल कॉलेज, मूंबई येथून पूर्ण झाले. मुग्धाला लहानपणापासूनच अभिनयाची फार आवड होती. शाळेत असताना ती वक्तृत्व स्पर्धा, नाटकांमध्ये सहभाग घ्यायची.

‘मदर्स डे’ हे मुग्धाचा पहिलाच नाटक. या नाटकाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिला पारितोषिक पटकावला होता. यानंतर मुग्धाने ‘गुमसुन’ या लघुपटात प्रमुख भूमिका साकारली. पुढे जाऊन तिला महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘गुमसुन’ या व्यावसायिक नाटकात अभिनय साकारण्याची संधी मिळाली. नंतर स्टार प्रवाह वाहिनीवरील महेश कोठारे निर्मित ‘विठू माउली’ या मालिकेत तिला काम करण्याची साधी मिळाली. हि तिची पहिलीच मालिका. झी युवा वरील ‘फुलपाखरू’ या मालिकेत मुग्धाने काम केले आहे. कलर्स मराठीवरील ‘मन हे बावरे’ या मालिकेतही तिने अभिनय साकारला होता.

सध्या ती ‘माझा होशील ना’ या मालिकेत नयना हे पात्र अगदी उत्तम रीतीने साकारत आहे. या मालिकेमुळे मुग्धाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. प्रेक्षकांकडून तिच्या अभिनयाचा कौतुक होत आहे.  

Title: Mugdha Puranik Biography, Wiki, Birthday, Age, Boyfriend, Education, Qualification, Family, Parents, Movies, Serials

Tags: Mugdha Puranik, Mugdha Puranik Biography, Mugdha Puranik Birthday, Mugdha Puranik Age, Mugdha Puranik Boyfriend, Mugdha Puranik Family, Mugdha Puranik Qualification, Mugdha Puranik Movies, Mugdha Puranik Serials

Leave a Comment

Exit mobile version