मृणाल ठाकूर आणि विजय देवरकोंडा पहिल्यांदाच झळकणार या चित्रपटात!

अभिनेत्री मृणाल ठाकूरने तिच्या अभिनयातून एक वेगळीच छाप पाडली आहे. मृणालने तिच्या Career ची सुरुवात छोट्या पडद्यामधून केली होती. मुझे कुछ कहती ये खामोशीया या हिंदी मालिकामधून तिने तिच्या करियर ची सुरुवात केली होती. झी टीव्ही वरील कुमकुम भाग्य या मालिकेतून तिला चांगलीच ओळख मिळाली होती. बुलबुल नावाचं पात्र प्रेक्षक खुप पसंत करायचे. या मालिकेमधून ब्रेक घेत तिने चित्रपट सृष्टीकडे आपले पाऊल टाकले.

मृणालने खुप साऱ्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे सिनेमे खुप गाजले आहेत. हिंदी, मराठी चित्रपटासोबत ती साऊथच्या चित्रपटांमध्ये देखील काम करत आहे. मृणाल आता साऊथ चा सुपरस्टार विजय देवरकोंडा याच्या सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. दोघेही पहिल्यांदाच एकमेकांसोबत काम करत आहेत. सोशल मीडिया वर फोटो पोस्ट करून याची माहिती स्वतः मृणालने दिली आहे.

Sri Venkateswara Creations या प्रॉडक्शन हाऊस सोबत मृणाल चित्रपट करणार आहे. मृणालने पोस्ट करत कॅप्शन मध्ये लिहिले आहे की उत्साहित प्रवासामधील ही माझे पहिले पाऊल आहे. Sri Venkateswara Creations या प्रॉडक्शन हाऊस सोबत काम करण्याची माझी पहिली वेळ आहे. विजय देवरकोंडा सोबत मला स्क्रीन शेअर करताना खुप आनंद होत आहे. शूट सुरू होण्याची प्रतीक्षा मी आता करू शकत नाही.

मृणालने मराठी चित्रपट विटी दांडू, हॅलो नंदन आणि सुराज्य मध्ये काम केले आहे. तिने पिप्पा, आंख मिचोली, जहान,धमाका, घोस्ट स्टोरीज, सेल्फी, पूजा मेरी जान, सुपर 30, जर्सी, गुमराह, सिता रामम या सिनेमांमध्ये काम केले आहे.

विजयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वर विडियो शेअर करून आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. मृणाल आणि विजय देवरकोंडा ची जोडी आपण मोठ्या पडद्यावर पाहणार आहोत. लवकरच शूटिंगची सुरुवात देखील होणार आहे. प्रेक्षक या नव्या कोऱ्या जोडीला किती पसंत करतात हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.

Leave a Comment

Exit mobile version