मराठी अभिनेत्रींचे खऱ्या आयुष्यातील प्रियकर कोण आहेत ते नक्की पहा.

प्रेम म्हणजे नक्की काय असत? तर प्रेम म्हणजे सतत आपल्याला आवडणारी व्यक्ति, तीच बोलणं, राहणं हेच मनात येत असत. प्रेमात पडणं आणि आपण कुणाला तरी आवडणं या खूप छान गोष्टी आहेत. महत्वाचं म्हणजे प्रेमात पडायचं तर दोघंही एकमेकांना मनापासून आवडायला पाहिजेत. तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की तुमचे आवडते मराठी कलाकार खऱ्या आयूष्यात कोणाच्या प्रेमात पडल्या आहेत.

  • रुचिरा जाधव – रोहित शिंदे

अभिनेत्री रुचिरा जाधव सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मायाची महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. प्रेक्षक देखील मायाच्या भूमिकेत रुचिरा ला भरभरून प्रेम देत आहेत. अभिनेत्री रुचिरा जाधव खऱ्या आयुष्यात डॉक्टर रोहित शिंदे याला डेट करत आहे. रोहित हा पेशाने डॉक्टर आहे. तसेच त्याला फिट राहायला खूप आवडतं. त्यामुळे तो न चुकता रोज वर्कआउट करतो. रुचिराला देखील फिटनेस ची खूप आवड आहे.

  • रेवती लेले – आदिश वैद्य

अभिनेत्री रेवती लेले पहिल्यांदाच आपल्याला स्वामिनी या मालिकेच्या माध्यमातून मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेत ती मोठ्या रमाबाई पेशवे यांची भूमिका साकारत आहे. अभिनेत्री रेवती लेले अभिनेता आदिश वैद्य याला डेट करत आहे. आदिश देखील एक उत्तम अभिनेता असून त्याने कुंकू टिकली आणि टॅट्टू, जिंदगी नॉट आउट यांसारख्या मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली होती.

  • अभिज्ञा भावे – मेहुल पै

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने खूप साऱ्या मराठी मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये काम केले आहे. खुलता कळी खुलेना या मालिकेतील तिची मोनिकाची भूमिका खूप गाजली. अभिज्ञा पहिल्या लग्नातून विभक्त झाल्यानंतर आत्ता ती मेहुल पै याला डेट करत आहे. मेहुल हा Clockwork Event PVT LTD कंपनीचा मालक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आपण मेहुल सोबत रिलेशन मध्ये असल्याची कबुली दिली आहे.

  • पूर्वा शिंदे – निखिल चव्हाण

लागीर झालं जी मालिकेत जयडीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूर्वा शिंदे हिला या मालिकेमुळे खूप प्रसिद्धी मिळाली. लागीर झालं जी ही तिची पहिलीच मालिका होती. याच मालिकेत अभिनेता निखिल चव्हाण हा देखील अजिंक्यचा मित्र विक्याची भूमिका साकारत होता. त्यामुळे त्यांच्यात जवळीक वाढली आणि ते प्रेमात पडले असे म्हंटले जात आहे. परंतु त्यांनी आपण रिलेशन मध्ये असल्याची कबुली अजून पर्यंत दिली नाही. पूर्वा आणि निखिल एकमेकांसोबतचे खूप सारे फोटो आपापल्या सोशल मीडिया अकाऊंट वर शेयर करत असतात. त्यामुळे चाहत्यांनी ते प्रेमात असल्याचा अंदाज लावला आहे.

  • मिताली मायेकर – सिद्धार्थ चांदेकर

अभिनेत्री मिताली मायेकर हिने मराठी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने बिल्लू या बॉलीवुड चित्रपटात इरफान खान यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. फ्रेशर्स या मालिकेमुळे मिताली मयेकर हिला खरी ओळख मिळाली. तिचा साखरपुडा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हिच्या सोबत झाला असून ते लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. सिद्धार्थ देखील मराठी कला विश्वातील एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे. त्याला मराठी कला विश्वात handsom hunk म्हणून ओळखले जाते.

  • रूपाली भोसले – अंकित मगरे

बिग बॉस फेम अभिनेत्री रूपाली भोसले ही आत्ता आई कुठे काय करते या मालिकेत संजनाची महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. तिने या पूर्वी हिन्दी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. पहिल्या लग्नातून विभक्त झाल्यानंतर ती आत्ता अंकित मगरे याला डेट करत आहे. अंकित मगरे हा कला विश्वाशीच निगडीत असून तो एक प्रोड्यूसर आणि The Social Hoot कंपनीचा मालक आहे. रूपाली नेहमी अंकित सोबतचे फोटो आपल्या सोशल मीडिया वर शेयर करत असते.

  • इषा केसकर – रिषी सकसेना

अभिनेत्री इषा केसकर हिने जय मल्हार या मालिकेत बाणाईची महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे इशाला खरी ओळख मिळाली. नंतर तिने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत काही दिवस शनायाची देखील भूमिका साकारली होती. इषा अभिनेता रिषी सकसेना याला डेट करत आहे. रिषी सकसेना याने काहे दिया परदेस या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. रिषी हा मराठी नसल्यामुळे इशाला खूप वेळेस प्रेक्षकांकडून Troll देखील करण्यात आले आहे.

  • अक्षया देवधर – सुयश टिळक

अभिनेत्री अक्षया देवधर हिला तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अंजलीबाईच्या भूमिकेमुळे खूप प्रसिद्धी मिळाली. ती आत्ता अभिनेता सुयश टिळक याला डेट करत असून सुयश देखील एक प्रसिद्ध मराठी अभिनेता आहे. सुयशने मराठी मालिका तसेच चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

  • शिवानी सुर्वे – अजिंक्य नणावरे

अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने बिग बॉस मराठीचा सीजन २ खूप गाजवला. तिने यापूर्वी देवयानी या मालिकेत देवयानी ची मुख्य भूमिका साकारली होती. संग्राम आणि देवयानी यांना संपूर्ण महाराष्ट्राने अगदी डोक्यावर घेतले होते. अभिनेत्री शिवानी सुर्वे अजिंक्य नणावरे याच्यासोबत रिलेशनशिप मध्ये आहे. अजिंक्य हा देखील एक मराठी अभिनेता आहे. त्याने अस्स सासर सुरेख बाई यांसारख्या अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

  • वीणा जगताप – शिव ठाकरे

अभिनेत्री वीणा जगताप आणि बिग बॉस मराठी सीजन २ चा विजेता शिव ठाकरे यांची लव स्टोरी तर सर्वानी बिग बॉसच्या घरात पाहिलीच आहे. वीणा आणि शिव यांचे बिग बॉसच्या घरातील प्रेम प्रकरण खूप गाजल. आत्ता देखील ते एकमेकांपासून खूप दूर राहू शकत नाहीत. शिव आणि वीणा यांचे बिग बॉस मधील ते क्षण अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

तर मित्रांनो हे आहेत मराठी अभिनेत्रींचे खऱ्या आयुष्यातील प्रियकर. यामधील तुमची सर्वात आवडती जोडी कोणती आहे ते कमेन्ट मध्ये नक्की सांगा.

Tags: marathi actress boyfriend, marathi actors real life partner, marathi stars real life partner, marathi actress real life husband, marathi actors real life wife, shivani surve boyfriend, shivani surve ajinkya nanaware, shiv thakare vina jagtap

Leave a Comment

Exit mobile version