तुमचे आवडते हे मराठी कलाकार बनले आईबाबा

२०२१ मध्ये अनेक मराठी कलाकारांनी गोड बातमी दिली. कोणी लग्नबंधनात अडकल तर कोणी आईबाबा बनले. २०२१ मध्ये काही मराठी कलाकारांच्या घरी नवीन पाहुण्यांचे आगमन झाले आहे. तर आज आपण पाहणार आहोत की कोणकोणते मराठी कलाकार २०२१ मध्ये आईबाबा बनले आहेत.

  • अंकुर वाढवे

चला हवा येऊ द्या फेम अभिनेता अंकुर वाढवे याला १४ जानेवारी रोजी कन्यारत्न प्राप्ती झाली. अंकुरने सोशल मीडियावर मुलीचा फोटो पोस्ट करत caption दिले की कालच्या दिवशी मी नवीन पात्रात प्रवेश केला आत्ता एक मुलीचा बाप झालो. ही गोड बातमी कळताच चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

  • समीर परांजपे

सुंदरा मनामध्ये भरली फेम अभिनेता समीर परांजपे याला प्रेक्षकांकडून खूपच पसंती मिळताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच समीरने देखील आपण बाबा झाल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. अभिनेत्री समीर परांजपे याने अगोदरच आपण बाबा होणार असल्याचे सांगत सोशल मीडियावर पत्नीसोबत एक फोटो पोस्ट केला होता. आत्ता त्याला कन्यारत्न प्राप्ती झाली आहे.

  • निपुण धर्माधिकारी

अभिनेता आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी हा देखील बाबा झाला आहे. त्याने आपल्या मुलीचा फोटो पोस्ट करत आपण बाबा झाल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. तेव्हा सर्वजण त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत होते.

  • आरोह वेलणकर

लाडाची मी लेक ग आणि बिग बॉस मराठी फेम अभिनेता आरोह वेलणकर याने देखील काही दिवसांपूर्वी पत्नी सोबत फोटो पोस्ट करत आपण लवकरच आईबाबा होणार असल्याची गोड बातमी दिली होती. आत्ता नुकतेच काही दिवसांपूर्वी अभिनेता आरोह वेलणकर बाबा झाला असून त्याला पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. सर्व स्तरांवरून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • धनश्री काडगावकर

तुझ्यात जीव रंगला मधील सर्वांची लाडकी नंदिता वहिनी म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर हिला २८ जानेवारी रोजी पुत्ररत्न प्राप्ती झाली. नुकतेच तिच्या मुलाला एक महिना पूर्ण झाला असून धनश्रीने आपल्या मुलाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अद्याप तिने आपल्या मुलाचा चेहरा मात्र दाखवला नाही.

  • शशांक केतकर

अभिनेता शशांक केतकर आणि पत्नी प्रियंका यांना देखील पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. शशांकने आपल्या मुलाचे नाव देखील जाहीर केले आहे. त्याने आपल्या मुलाचे नाव ऋग्वेद असे ठेवले आहे. सर्व स्तरांवरून अभिनेता शशांक केतकर याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आत्ता तो पाहिले न मी तुला या नवीन मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे.

Tags: Marathi Actors blessed with baby, Marathi actors kids, marathi actress kids, shashank ketkar blessed with baby boy, dhanashri kadgaonkar babyboy, ankur wadhave babygirl, aroh welankar baby, sameer paranjape baby

Leave a Comment

Exit mobile version