ज्येष्ठ मराठी अभिनेते अविनाश खर्शीकर काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे वय ६८ वर्षे होते. गेल्या ९ महिन्यापासून ते आजारी होते. अखेर आज सकाळी १० वाजता त्यांनी ठाण्यातील राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. अविनाश खर्शीकर यांच्या दुःखद निधनामुळे मराठी चित्रपटश्रुष्टीवर शोककळा पसरली आहे.  

अविनाश खर्शीकर यांनी मराठी चित्रपटसृष्टी, मराठी रणभूमी तसेच मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.   अविनाश खर्शीकर यांनी ‘दामिनी या गाजलेल्या मालिकेत काम केले होते. ‘बंदिवान मी या संसारी’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. त्यानंतर ‘माफीचा साक्षीदार’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘चालू नवरा भोळी बायको’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. त्याचबरोबर ‘लफडा सदन’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘दिवा जळू दे सारी रात यांसारख्या नाटकांत त्यांनी अभिनय साकारला होता. 

tags: avinash kharshikar expired, avinash kharshikar news, avinash kharshikar death

Leave a Comment

Exit mobile version