मन उडु उडु झालं फेम अजिंक्य राऊत झळकणार ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेत!

सोनी मराठीवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकतीच तुजं माजं सपान प्रेमाचं तुफान ही मालिका 19 जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यानंतर आणखी एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे नाव ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ असे आहे. ही मालिका 17 जुलै पासून सोम ते शनि, संध्या.7:30 वा. सोनी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या मालिकेचा प्रोमो नुकताच रीलीज झाला आहे. प्रोमो पाहता या मालिकेत अभिनेता अजिंक्य राऊत मुख्य भूमिका साकारणार आहे. अजिंक्यने विठू माऊली, मन उडु उडु झालं या मालिकेत मुख्य भूमिका केल्या आहेत. त्याने विठू माऊली या मालिकेत विठ्ठलाची तर मन उडु उडु झालं या मालिकेत इंद्रजीत ची भूमिका साकारली होती. या दोन्हीही मालिकांमुळे त्याला खूपच प्रसिद्धी मिळाली होती.

अजिंक्य विठू माऊली या मालिकेत अभिनेत्री एकता लबदे सोबत मुख्य भूमिकेत होता तर तो मन उडु उडु झालं या मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे सोबत मुख्य भूमिकेत होता. या दोन्हीही मालिकेत एकता आणि हृता सोबत त्याची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना खुप आवडली. आता तो ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेत अभिनेत्री जान्हवी तांबट सोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

जान्हवीने मिस महाराष्ट्र 2022 मध्ये भाग घेतला होता. यामध्ये ती 1st runner up आली होती. तिने झी मराठीवरील घेतला वसा टाकू नको, सन मराठीवरील संत गजानन शेगावीचे या मालिकांमध्ये काम केले आहे. अजिंक्यने टकाटक 2 , सरी अशा मराठी सिनेमांमध्ये काम केले आहे.

Leave a Comment

Exit mobile version