ही अभिनेत्री साकारणार नंदिता वहिनीची भूमिका

छोट्या पडद्यावर ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. हि मालिका आता रंजकदार वळणावर पाहायला मिळत आहे.  तुझ्यात जीव रंगला या मालिकेला ४ वर्षे पूर्ण झाली असून या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे. 

काही दिवसांपूर्वी तुझ्यात जीव रंगला हि लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा सर्वत्र होती. पण मुळात हि एक अफवा असून तुझ्यात जीव रंगला हि मालिका बंद होणार नसून या मालिकेत आता एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत पुन्हा एकदा नंदिताची एन्ट्री होणार आहे. 

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील खलनायिकेची भूमिका साकाणारी नंदिता हे पात्र पुन्हा एकदा मालिकेत दिसणार आहे. याआधी नंदिता हे पात्र अभिनेत्री धनश्री काडगावकररने साकारले होते. मालिकेत तिने खलनायिकेची भूमिका जरी साकारली असली तरी तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल. परंतु नंदिताच्या कटकारस्थानामुळे तिला तुरुंगाची हवा खायला पाठवण्यात आले. आत्ता नंदिताचे पात्र संपले असे सर्वांना वाटले होते. परंतु मालिकेची trp rating घसरल्यामुळे मालिकेत काहीतरी नवीन ट्विस्ट आणण्यासाठी पुन्हा एकदा नंदिता तुझ्यात जीव रंगला मालिकेत एंट्री घेणार आहे.

परंतु नंदिताची भूमिका कोण साकारणार हा मोठा प्रश्न होता, कारण पहिल्या नंदिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर आत्ता pregnant आहे. त्यामुळे ती मालिका करू शकत नाही. काही दिवसांपूर्वीच तिने आपण आई होणार असल्याचे सांगितले होते. आता मालिकेतील नंदिताची भूमिका अभिनेत्री माधुरी पवार साकारताना दिसणार आहे. माधुरी पवार हि झी युवावरील ‘अप्सरा आली’ या डान्स रिऍलिटी शोची विनर आहे. माधुरी एक प्रसिद्ध डान्सर असून ती सोशल मीडिया वर खूपच सक्रिय असते. तर मित्रांनो अभिनेत्री माधुरी पवार हिला नंदिताच्या रूपात पाहायला तुम्हाला आवडेल का? ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version