माधवी नेमकर बद्दल बरंच काही जाणून घ्या

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील शालिनीची कटकारस्थान पाहून साहजिकच प्रेक्षकांना तिचा खूप राग येतो. हीच तिच्या अभिनयाची पोचपावती आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत शालिनी गौरीला खूप त्रास देत असते. परंतु खऱ्या आयुष्यात शालिनी म्हणजेच अभिनेत्री माधवी नेमकर कशी आहे ते आपण पाहणार आहोत.

माधवी नेमकर एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. माधवीच्या जन्म १७ मे १९८३ रोजी खोपोली येथे झाला. माधवी रिअल लाईफ मध्ये खूपच ग्लॅमरस आहे. वयाची ३७ वर्षे ओलांडली तरी माधवी अतिशय सुंदर आणि फिट दिसते. माधवीच्या पतीचे नाव विक्रांत कुलकर्णी असे असून त्यांना सहा वर्षांचा रूबेन नावाचा मुलगा आहे.  माधवी एक उत्तम फिटनेस फ्रिक देखील आहे. माधवी तिच्या फिटनेसकडे अजिबात दुर्लक्ष करत नाही. ती नियमित पणे योगा करत असते. लॉकडाऊन काळात माधवी abp माझावर योगासनाचे कलाससेस देखील घेत होती. अत्यंत सोप्या पद्धतीने ती प्रेक्षकांना योगासने करून दाखवायची.   

अभिनेत्री माधवी नेमकरने तिच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात २००७ मध्ये केली. माधवीने तिच्या अभिनय कौशल्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. २००७ रोजी ‘गाणे तुमचे आमचे’ या कार्यक्रमासाठी तिला निवेदिका म्हणून बोलविण्यात आलं.  ‘अवघाचि संसार’ या मराठी चित्रपटातून तिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ‘बायकोच्या नकळत’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ‘अवघाचि संसार’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘जावई विकत घेणे’ या मालिकांमध्ये अभिनय साकारून तिने प्रेक्षकांची मने जिंकली. त्याचबरोबर ‘संघर्ष’, ‘नवरा माझा भवरा’, ‘सगळं करून भागलं’, ‘धावाधाव’, ‘बायकोच्या नकळत’, यांसारख्या मराठी चित्रपटामध्ये तिने काम केले आहे.  

सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असता’ मालिकेत शालिनी हि खलनायिकेची भूमिका अगदी उत्तम रीतीने साकारत आहे.       

Title: Madhavi Nemkar Wiki, Biography, Birthday, Age, Husband, Kids, Family, Parents, Qualification, Movies, Serials, Yoga

Leave a Comment

Exit mobile version