लागीर झाल जी मालिकेतील जीजीचे दुखद निधन

लागीर झालं जी फेम जीजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कमल ठोके यांचे दुखद निधन झाले आहे. लागीर झाल जी या मालिकेत कमल ठोके यांनी अजिंक्यची आजी म्हणजेच जीजीची भूमिका साकारली होती. निधनाचे खरे कारण अजून स्पष्ट झाले नसून लागीर झाल जी मालिकेचे दिग्दर्शक तेजपाल वाघ यांनी सोशल मीडियावर कमल ठोके यांच्या निधनाची पोस्ट शेयर करत भावूपर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

लागीर झाल जी मालिकेतील कलाकार जिजीच्या निधनाची बातमी ऐकून भावुक झाले आहेत. मालिकेतील कलाकारांनी देखील अभिनेत्री कमल ठोके यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लागीर झाल जी मालिकेचे दिग्दर्शक तेजपाल वाघ यांनी जिजीच्या निधनाची पोस्ट शेयर करत लिहिले आहे की “जिजे.. तुझी लय आठवण यील.. लव यू.. निशब्द..”

या पोस्टखाली मालिकेतील कलाकारांनी कमेन्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे. तर मित्रांनो तुम्हाला जीजीची भूमिका कशी वाटली ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा. AtoZ Marathi टीम कडून अभिनेत्री कमल ठोके यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Title: Lagira Zhal Ji fame Kamal Thoke Jiji Expired

Leave a Comment

Exit mobile version