‘काव्यांजली – सखी सावली’ ही नवीन मालिका कलर्स मराठीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी मनोरंजन विश्वात अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. स्टार प्रवाह, कलर्स मराठी, झी मराठी, सन मराठी अशा चॅनल वर नवीन मालिका येत आहेत. ही मालिका २९ मे पासून  सोम ते शनि, रात्री ८:३० वा. प्रदर्शित होईल. कलर्स मराठीवर ही नवीन मालिका एक वेगळा विषय घेवून येत आहे.

मालिकेच्या प्रोमो मध्ये एका पती आणि पत्नीची गोष्ट दाखवण्यात आली असून त्यांच्या लग्नाला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. ही नवीन मालिका एका गृहिणीच्या जीवनावर अवलंबून आहे. प्रोमो पाहता या  मालिकेचे कथानक संदेशपूर्ण असल्याचे दिसून येत आहे.

या मालिकेमध्ये अभिनेता पियुष रानडे, अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी आणि अभिनेत्री प्राप्ती रेडकर मुख्य भूमिकेत आहेत. पियुष आणि कश्मिरा हे पती-पत्नी असून प्राप्ती ही कश्मिराची बहीण आहे. मालिकेच्या प्रोमोवरून प्रेमाच्या धाग्यात गुंफलेली बहिणींच्या नात्याची घट्ट वीण दाखवण्यात आली आहे.

काव्यांजली – सखी सावली ही नवीन मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

https://www.youtube.com/watch?v=tagv_kh3eaE

Leave a Comment

Exit mobile version