अभिनेत्री हृता दुर्गुळेची होणारी सासु देखील आहे उत्तम अभिनेत्री

दुर्वा आणि फुलपाखरू या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. हृता सध्या झी मराठी वरील मन उडु उडु झाल या मालिकेत मुख्य नायिकेच्या भुमिकेत दिसून येतेय. काही दिवसांपासून हृता खुपच चर्चेत आहे याच करण म्हणजे काही दिवसांपूर्वी हृताने तिच्या बॉयफ्रेंड सोबत एक फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. तेव्हापासुन हृता आणि प्रतीकच्या नावाची चर्चा सगळ्यांमद्धे आहे. आपल्या अभिनयाने आणि सौदर्याच्या जोरावर हृताने तिचा एक खुप मोठा चाहता वर्ग तयार केलाय. त्यामुळे तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते आतुर असतात.

हृताचा बॉयफ्रेंड प्रतीक शाह हा एक उत्तम दिग्दर्शक तसेच उत्तम डान्सर आहे. आणि विशेष म्हणजे प्रतीकची आई देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. फार कमी लोकांना प्रतीकच्या फॅमिलीविषयी महित आहे. प्रतीकच्या आईचे नाव अभिनेत्री मुग्धा शाह असे आहे. त्यांनी अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये तसेच हिंदी मराठी मालिकांमध्ये काम केली आहेत. दुर्वा या मराठी मालिकेत हृता आणि त्यांनी मायलेकीची भूमिका साकारली होती. आणि म्हणूनच प्रतीक आणि हृतासोबतच आता अभिनेत्री मुग्धा शाह यांची देखील चांगलीच चर्चा रंगलीये.

हृताचा बॉयफ्रेंड प्रतीकने बेहद, बहु बेगम, कुछ रंग प्यार के ऐसे भी या गाजलेल्या मालिकांसाठी काम केली आहेत.

तर हृता आणि प्रतीकची जोडी तुम्हाला कशी वाटते हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version