हे मन बावरे मालिकेतील कलाकारांनी निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा केला आरोप

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने हे मन बावरे मालिकेचे निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आहे. चॅनलकडून पैसे मिळून देखील निर्माते मंदार देवस्थळी यांनी कलाकारांचे आणि तंत्रज्ञांचे पैसे थकवले आहेत असा गंभीर आरोप अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने केला आहे. काही दिवसांपूर्वीच हे मन बावरे या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला परंतु आत्तापर्यंत या कलाकारांचे पैसे त्यांना मिळाले नसल्याने शेवटी शर्मिष्ठा राऊत, विदिशा म्हसकर, संग्राम समेळ आणि अभिनेत्री मृणाल दुसाणीस यांनी सोशल मीडियाचा आधार घेत वाचा फोडली आहे.

सोशल मीडियावर शेयर केलेल्या या पोस्ट मध्ये असे लिहिली आहे की “नमस्कार, आम्ही कलाकार चॅनल असो निर्माता कोणीही असो आम्ही कलाकार नेहमीच आपल्याकडून चांगल काम व्हाव या हेतूने मेहनत घेत असतो. उत्तम काम आणि ते केल्यावर त्याचा योग्य मोबदला हाच हेतु असतो आणि तो असावा. पण काम करूनही त्याचा पैसा वेळेवर न मिळण, योग्य आहे? अनेक वेळ अस होत की आपण खूप प्रामाणिक पणे आपल काम करतो. आपल प्रोजेक्ट हे आपल बाळ आहे आणि प्रॉडक्शन हाऊस हे आपल घर अस समजून वेळेची, परिस्थितीशी, घरच्यांशी, प्रॉडक्शन हाऊस कडून न मिळणाऱ्या गोष्टींशी, प्रॉडक्शन हाऊस च्या मिस्स मॅनेजमेंटशी अॅडजस्ट करून सर्व तंत्रज्ञ आणि कलाकार अविरत काम करत असतात. चॅनल चा उत्तम सपोर्ट असूनही निर्माता कामाचा योग्य तो मोबदला देत नाहीत. अनेक कारण वारंवार मिळत असतात.”

तर मित्रांनो या संपूर्ण प्रकरणावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Tags: He Man Baware fame Sharmishtha Raut speaks about not yet paid by Producer Mandar Devsthali

Leave a Comment

Exit mobile version