अभिनेत्री गौरी किरण हिचे भिकारीच्या लूकमधील फोटो वायरल

सोशल मीडियावर सध्या एका अभिनेत्रीचा भिकारीच्या वेशातील फोटो व्हायरल होत आहे. या गेटअपमुळे ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण ? असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय परंतु याबाबत उलगडा झाला असुन भिकारीच्या वेशातील ही अभिनेत्री ‘गौरी किरण’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आज आपण जाणून घेऊयात गौरी किरणने हा गेटअप नेमका का आणि कशासाठी केला आहे.

स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत सध्या गौरी किरण सोयराबाई ही महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. ‘पुष्पक विमान’ या चित्रपटातून तिने सुबोध भावे सोबत महत्वाची भूमिका साकारली होती. याशिवाय सुंदरा मनामध्ये भरली, स्पेशल ५ , बोलते तारे यातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि आता गौरी किरण लवकरच आपल्या आगामी चित्रपट ब्लॅकेटच्या माध्यमातून एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातील मानसिक संतुलन ढासळलेल्या भिकारीच्या भूमिकेमुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. याभूमिकेसाठी तीला खऱ्या कचरा डेपोत जाऊन तिथेच झोपण , तिथेच जेवण करायला लागणार होत असं दिग्दर्शक राज गोरडे यांनी सांगितल होत. पण तरीही गौरीने ‘आता मागे हटायच नाही’ असा निर्णय घेतला .

गौरीने सांगितले की, या चित्रपटात काम करताना माझा कचऱ्याशी संपर्क आल्यामुळे मला २ वेळा युरीन इन्फेक्शन झाले होते. या गेटअप साठी मी कित्तेक दिवस नख साफ केली नवती तर विस्कटलेल्या विग सतत डोक्यात असल्यामुळे माझे केस कित्तेकदा तुटले देखील आहेत.

हा येणारा ब्लॅकेटहा चित्रपट स्त्री भ्रूण हत्तेवर आधारित आहेच , पण यातील इतर पैलू देखील अतिशय महत्वाचे आहेत. स्त्रीभ्रूण हत्तेचा परिणाम काय होतो, स्त्री करियरबाबत जागरूक असते, पण तीला वात्सल्यही हवं असतं. ती लिंग भेद करत नाही, पण समाजव्यवस्थेचा बळी मात्र ठरते असं सगळ या चित्रपटात आहे. तर गौरी किरणची ही भूमिका पाहण्यासाठी तुम्हांला आवडेल का ? हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा .

Leave a Comment

Exit mobile version