‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम आकाश पाटील याचा साखरपुडा संपन्न

‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका घराघरात पोहचलेली मालिका होती. प्रत्येक कुटुंबात या मालिकेचे फॅन्स असायचे आणि आजपण या मालिकेला प्रेक्षक खुप मिस करतात. सोशल मीडियावर ही मालिका खुप ट्रेंड झाली होती. या मालिकेतील जिजीअक्का, कीर्ती, शुभम, विक्रम, तुषार, सोनाली या पात्रांना प्रेक्षक खुप पसंत करायचे. अल्पावधीत ह्या मालिकेने निरोप घेतला. मालिका बंद झाल्यामुळे प्रेक्षकांनी खुप नैराश्य दाखवले.

या मालिकेतील शुभमचा म्हणजेच हर्षद अटकरीचा सर्वात लहान भाऊ तुषार ह्या पात्राला देखील लोक पसंत करायचे. तुषार हा शेंडेफळ होता. तुषार म्हणजेच अभिनेता आकाश प्रशांत पाटील. तुषारची भूमिका तशी थोडीशी नकारात्मक होती. ही मालिका आकाशची पहिली मालिका होती, ज्यामध्ये त्याने पहिल्यांदा काम केले होते. या अगोदर त्याने ‘टकाटक’ या मराठीसिनेमामध्ये काम केले होते.

आकाश हा मूळचा साताऱ्याचा आहे. आकाशचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला आहे.  ही माहिती  सोशल मीडियाद्वारे नुकतीच कळली आहे. आकाशच्या होणाऱ्या बायकोचे नाव शमिका साळवी असे आहे. शमिका कोण आहे? काय काम करत आहे? हे अद्याप माहिती नाही. दोघांची खुप सुंदर जोडी दिसत आहे. दोघांनी एकमेकांना अंगठी घालत हा आनंदाचा क्षण पार पडला. दोघेही त्यांच्या ड्रेस मध्ये खुप सुंदर दिसत होते. शमीकाने रिंग सेरेमनीच्या वेळेस हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती. आकाशने काळ्या रंगाचा कुर्ता आणि लाल कलरचे जॅकेट परिधान केले होते.

आकाशच्या साखरपुड्याला अभिनेत्री समृद्धी केळकरने देखील हजेरी लावली होती. समृद्धीने या जोडप्यासोबत छान असा फोटो देखील काढला आहे. आता आकाशच्या लग्नाची त्याचे फॅन्स वाट पाहत आहे.

आकाश आणि शमिका या दोघांची जोडी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version