फॅन्ड्री चित्रपटातील जब्याचा लुक पूर्णपणे बदलला, पहा आत्ता कसा दिसतोय

नागराज मंजुळे यांचा फॅन्ड्री हा चित्रपट विशेष गाजला होता. या चित्रपटातील जब्या आणि शालू यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. जब्याची भूमिका अभिनेता सोमनाथ अवघडे याने साकारली होती तर शालूची भूमिका अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने साकारली होती. जब्याच्या भूमिकेसाठी अभिनेता सोमनाथ अवघडे याला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. परंतु हा जब्या आत्ता आहे तरी कुठे आणि आत्ता जब्या कसा दिसतोय हे पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.

इतक्या वर्षात फॅन्ड्री फेम अभिनेता सोमनाथ अवघडे याच्या लूकमध्ये खूपच बदल झाला आहे. आत्ता त्याला ओळखणे देखील कठीण झाले आहे. त्याचे काही फोटो देखील समोर आले आहेत आणि आत्ता लवकरच तो आपल्याला नवीन भूमिकेत दिसणार आहे.

फ्री हीट दणका या नवीन चित्रपटात अभिनेता सोमनाथ अवघडे झळकणार आहे. हा चित्रपट १६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून अभिनेता सोमनाथ अवघडे आत्ता या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याशिवाय या चित्रपटात सैराट फेम लंगडया आणि सल्या देखील आपल्याला पाहायला मिळतील.

तर मित्रांनो फॅन्ड्री फेम अभिनेता सोमनाथ अवघडे याचा फ्री हीट दणका हा चित्रपट पाहायला तुम्हाला आवडेल का? सोमनाथचा नवीन लुक तुम्हाला कसा वाटला ते कमेन्ट करून नक्की सांगा.

Tags: Fandry fame actor Somnath Awaghade – Jabya new look

Leave a Comment

Exit mobile version