ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अप्पू ला भेटली ही नवीन मालिका, दिल खास सर प्राइज!

Dnyanda New Serial : स्टार प्रवाह वरील ” ठिपक्यांची रांगोळी ” ही मालिका सर्व मराठी प्रेक्षकांना माहितीच असेल. ही मालिका प्रचंड गाजली, या मालिकेतील अल्लड अशी भूमिका होती ती म्हणजे अप्पूची , या अप्पूच्या भूमिकेला प्रेक्षकांनी अगदी भरभरून प्रेम दिलं. या अप्पू ने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होत. अप्पूची ही भूमिका अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थ साकारत होती. या अप्पू च्या भूमिकेमुळे ज्ञानदा ला खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेमुळे ती प्रसिद्धी झोतात आली.

पक्यांची रांगोळी ही मालिका नोव्हेंबर २०२३ मध्ये बंद झाली. त्यानंतर मात्र ज्ञानदा च्या हाती मात्र काही काम नव्हत. परंतु नुकतच ज्ञानदा ने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वर एका हिंदी मालिकेची घोषणा केली आहे.

ज्ञानदा ने आपण नवीन प्रोजेक्ट करत आहोत याची माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे. ज्ञानदा ने आपल्याला हिंदी मालिका मिळाली असल्याचं सांगितल आहे.

ज्ञानदा ला काम करत असलेल्या हिंदी मालिकेच नाव आहे, ” कमांडर करण सक्सेना” . या वेब सीरीज मध्ये ती मिली हे पात्र साकारनार आहे. अशी तिने माहिती दिली आहे. या मालिकेच्या सेट वरचे काही फोटोस तिने शेयर केले आहेत. तिने सेट वरील व्हॅनिटी व्हॅन फोटो चाहत्यांसोबत शेयर केले आहेत.

डेली सोप च्या माध्यमातून घरोघरी पोहचलेली ज्ञानदा, आता ओटीटी च्या विश्वाकडे वळाली आहे. आता ती हॉटस्टार वर येणाऱ्या ” कमांडर करण सक्सेना ” या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

Dnyanda Ramtirth

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थ ने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट वर पोस्ट शेयर करत कैप्शन मध्ये लिहिलं आहे की, ” लोक मला विचारायचे, आता पुढे काय? ही आहे माझी पहिली हिंदी वेन सीरीज, आपली आफिली हिंदी वेब सीरीज ” कमांडर करण सक्सेना ” . कमांडर करण सक्सेना मधील मिली तुम्हाला भेटायला येत आहे.

ज्ञानदा च्या या पोस्ट वर तिच्या चाहत्यांनी अगदी भरभरून कमेंट केल्या आहेत. आणि तिला शुभेच्छा देत आहेत.

कमांडर करण सक्सेना ही मालिका 8 जुलै पासून डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लेटफॉर्म वर प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरीज मध्ये मराठी मोली अभिनेत्री हृता दुर्गुळे सुद्धा महत्वाच्या भूमिकते दिसणार आहे .

आणखी वाचा :

Tharal Tar Mag New Twist : ठरलं तर मग मालिकेत नवीन ट्विस्ट, प्रिया सगळ्यांना सांगणार महिपत आणि नागराज सत्य!

आई कुठे काय करते मधील संजनाने घेतलं हक्काचं घर! – एकेकाळी राहत होती पत्र्याच्या घरात

Leave a Comment

Exit mobile version