‘माऊ’ या भूमिकेनंतर अभिनेत्री दिव्या पुगावकर दिसणार ‘मन धागा धागा जोडते नवा ‘ या मालिकेतील ‘आनंदी ‘ या भूमिकेत

स्टार प्रवाह वरील बहुचर्चित मालिका ‘मुलगी झाली हो’ ही सर्वांची आवडती मालिका होती.प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरून प्रेम दिले. या मालिकेतील ‘माऊ’ हे सर्वांच आवडतं पात्र होत. माऊ हे पात्र आठवलं की आपल्याला एका मुक्या म्हणजेच न बोलणाऱ्या पात्राची आठवण होते. न बोलणाऱ्या माऊला आपण पाहिलंत, त्या पात्राला आपण भरभरून प्रेम दिलं. दिव्या ही आपली एक लाडकी अभिनेत्री बनली. पूर्ण महाराष्ट्रात ही मालिका trending झाली.


‘मन धागा धागा जोडते नवा ‘ही नवीन मालिका 8 मे 2023 पासून प्रदर्शित होत असून ,संध्या. ६:३० वा. प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अभिनेत्री दिव्या पुगावकर ‘आनंदी’ या नावाचं पात्र साकारणार आहे. ही मालिका एका घटस्फोटीत महिलेच्या जीवनावर अवलंबून आहे. आनंदी ही एक घटस्फोटीत महिला असून ती आपल्या आई बाबांच्या घरीच राहते , असे मालिकेच्या प्रोमो मध्ये दाखवण्यात आले आहे. खरचं ही नवीन मालिका प्रेक्षकांना नक्की आवडेल असं दिव्या म्हणते.


मुलाखतीत दिव्या म्हणते आजपर्यंत तुम्ही न बोलणाऱ्या दिव्याला पाहिलंत, आता बोलणाऱ्या दिव्याला पहा. दिव्या पुढं म्हणते, जेव्हा पण मुलगी झाली हो या मालिकेचे scene व्हायचे तेव्हा emotion साठी मन धागा धागा जोडते नवा…….. हे गाणं play व्हायच. दिव्या म्हणते मन धागा धागा जोडते नवा ह्या title सोबत माझ एक खास कनेक्शन आहे . मुलगी झाली हो या पूर्ण unit ला हे गाणं पाठ होतं आणि माझ्या नवीन मालिकेचे Title पण मन धागा धागा जोडते नवा आहे.


या मालिकेत दिव्या सोबत आपल्याला अभिनेता अभिषेक रहाळकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच या दोघांची Chemistry आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही नवीन मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ? तसेच दिव्या आणि अभिषेकची नवीन जोडी पाहायला तुम्हाला आवडेल का?आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version