कलर्स मराठी वाहिनीवर येतेय ही नवी मालिका ‘बायको अशी हव्वी’

कलर्स मराठी वाहिनीवर नुकताचं एक प्रोमो प्रदर्शित झालेला दिसून येतोय . त्यातुन असं दिसून येतय कि कलर्स मराठी वाहिनीवर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संसारासाठी कष्ट करताना चेहरा कायम हसरा ठेवणारी . . . . ‘बायको अशी हव्वी’ ही नवीन गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारं आहे.

‘बायको अशी हवी’ असं मालिकेच नाव असुन त्यात प्रमुख भुमिकेत अभिनेत्री गौरी देशपांडे आणि अभिनेता विकास पाटील दिसणार आहे. या प्रोमो मद्धे असं दिसून येतय की बायकांचं काम हे फक्त चुल आणि मुल संभाळण इतकच असतं. घर सांभाळणारी , घरातल्या जबाबदऱ्या सांभाळणारी , स्वतःच करिअर न करता घरात राहणारी  ‘बायको अशी हव्वी’. या मालिकेत आपल्याला नक्कीच काहीतरी वेगळी स्टोरी पाहायला मिळणार आहे.

कलर्स मराठीवरील कोणती मालिका बंद होऊन त्याजागी ही नवी मालिका येणार आहे हे अजुन तरी गुलदस्त्यातचं आहे.

 तर या नविन मालिकेचा प्रोमो पाहून तुम्हांला काय वाटतं हे आम्हांला कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version