ठिपक्यांची रांगोळी फेम अभिनेता चेतन वडनेरे आणि अभिनेत्री ऋतुजा धारप यांचा साखरपुडा संपन्न!

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ठिपक्यांची रांगोळी मधील शशांक या पात्राला आतापर्यंत खूप समिश्र प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत. त्यामुळे शशांक नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय असतो. मालिकेतील शशांक-अप्पू या जोडीलाही रसिकांकडून कमालीचा प्रतिसाद मिळतोय. शशांक हे पात्र साकारणारा अभिनेता चेतन वडनेरेने आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरवात केलेली आहे. नुकतीच चेतनची एंगेजमेंट झाली. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.


अभिनेता चेतन वडनेरे आणि अभिनेत्री ऋजुता धारप यांचा 19 डिसेंबर 2022 रोजी साखरपुडा सोहळा थाटामाटात पार पडला. बऱ्याच दिवसांपासून चेतन आणि ऋजुता एजमेकांना डेट करत होते. याची माहिती त्यांनी त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेली होती. त्यामुळे दोघे ऑफिसिअली एकत्र कधी येणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर ही एंगेजमेंट करून ऋजुता आणि चेतनने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरवात केलीये.

ऋजुता आणि चेतन दोघांनी फुलपाखरू या लोकप्रिय मालिकेत एकत्र काम केल होत. या मालिकेच्या सेटवरच दोघांची पहिली भेट झाली होती. मालिकेदरम्यानच दोघांच्या प्रेमाचा पहिला अध्यायसुद्धा सुरु झालेला होता आणि आता दोघांनी एंगेजमेंट केलेली आहे. आता हे दोघे लग्न कधी करणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष असेल. ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील शशांक या भूमिकेमुळे चेतन वडनेरेला चांगलीच लोकप्रियता मिळत आहे.

Leave a Comment

Exit mobile version