या सुप्रसिद्ध मराठी कलाकारांचा झाला आहे ब्रेकअप

सेलिब्रिटींचे ब्रेकअप त्यांच्या चाहत्यांना नेहमीच धक्का देणारे असतात. सेलिब्रिटींच जीवन चाहत्यांना नेहमीच आकर्षित करणारं असतं आणि जेव्हा त्यांच्या ब्रेकअप बद्दल कळते तेव्हा चाहते निराश होतात.

पाहूया कोणकोणत्या मराठी कलाकारांचे ब्रेकअप झाले आहेत.

  • सुयश टिळक आणि अक्षया देवधर

शुभमंगल ऑनलाइन मालिकेतील अभिनेता सुयश टिळक आणि तुझ्यात जीव रंगला अभिनेत्री अक्षया देवधर टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चित जोडप्यांमधील एक होते. आता सुयशने अक्षया सोबतचे सर्व फोटो डिलीत केली आहेत आणि त्यांच्या Long Distance Relationship मुळे त्यांच्यात ब्रेक अप झाल्याच म्हंटल जात आहे. ते दोघेही आता एकमेकांपासून वेगळे होऊन खूप आनंदी आहेत.

  • मिताली मयेकर

लाडाची मी लेक गं ह्या मालिकेतील अभिनेत्री मिताली मयेकर एक थिएटर ग्रुपचा भाग होती तिचा मित्र आणि जिगरबाज मालिकेतील अभिनेता श्रेयश राजे याला ती डेट करत होती. रिलेशनशिपच्या काही महिन्यानंतर मिताली श्रेयसपासून दूर गेली. दोघांनीही सोशल मीडिया वर एकमेकांना फॉलो केले नाही आणि आत्ता मिताली आणि सिद्धार्थ चांदेकर हे दोघेही विवाहबंधनात अडकले आहेत.

  • अनिकेत विश्वासराव

जवळपास आठ वर्षाच्या प्रेमसंबंधात असलेली ही जोडी म्हणजेच अनिकेत आणि पल्लवी यांनी जेव्हा वेगळ व्हायचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या चाहत्यांना धक्काच बसला होता. त्यांच्यातील ह्या निर्णयाची खूप चर्चा पसरली होती आणि अनिकेत व पल्लवी चर्चेला विषय बनले.

  • पुष्कर जोग

बिग बॉस मराठी फेम अभिनेता पुष्कर जोग आणि त्याची गर्लफ्रेंड रोमा अभ्यंकर एकमेकांच्या प्रेमात होते. दोघांची लग्नगाठ बांधण्याचे ठरले होते, परंतु काहीतरी गडबड झाली आणि लग्न होऊ शकले नाही. नंतर पुष्करणे लग्नाच्या चार दिवस आधी एयर होस्टेस गर्लफ्रेंड सोबत लग्नाची घोषणा करून सर्वांना चकित केले. पुष्करच्या आयुष्याविषयी फार कमी लोकांना महित आहे.

  • सिद्धार्थ चांदेकर

सिद्धार्थ चांदेकर याचे नाव बऱ्याच अभिनेत्रींशी जोडले गेले आहे, परंतु सांग तू आहेस का फेम अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मुग्धा  परांजपे सात वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. सिद्धार्थ आणि मुग्धा त्यांच्या नात्याबद्दल नेहमीच बोलके होते आणि चित्रपटांच्या प्रीमियरसाठीही ते दोघे एकत्र असायचे, नंतर वैयक्तिक कारणांमुळे ते दोघे वेगळे झाले आणि आता सिद्धार्थ आणि मिताली ही दोघेही विवाहबंधनात अडकले आहेत.  

Tags: Breakup of Marathi Actors, Marathi Actress Breakup, Marathi Actors Breakup, Siddharth Chandekar Breakup, Mitali Mayekar Breakup, Pushkar Jog Breakup

Leave a Comment

Exit mobile version