बिग बॉस फेम अभिनेत्री रूपाली भोसले विवाह बंधनात अडकली?

बिग बॉस मराठी सीजन २ फेम अभिनेत्री रुपाली भोसले सध्या चर्चेत आहे ती तिने पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे. नुकताच रुपालीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेयर केला आहे. रुपालीने तिचा प्रियकर अंकित मगरे सोबत हा फोटो शेयर केला आहे. या फोटो तिने लाल रंगाची साडी नेसली असून गळ्यात मंगळसूत्र घातले आहे. “आय लव्ह यू अंकित मगरे, मैं तेरी प्रिन्सेस हू”. असे कॅपेंशन तिने या फोटोला दिले आहे.

या फोटोवरून दोघांनी लग्न केले कि काय अशी चर्चा सर्वत्र आहे. परंतु रुपालीने अद्याप लग्नाबद्दल काही जाहीर केले नाही. रुपालीचा प्रियकर अंकित मगरे हा एक बिसनेसमॅन आहे. अभिनेत्री रुपाली भोसले सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेत संजनाची महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे.

Tags: Bigg Boss fame rupali bhosale got married, Rupali Bhosale Wedding News

Leave a Comment

Exit mobile version