Bigg Boss Marathi 5 Suraj Chavhan : अरबाज साठी सूरज चव्हाण एकटाच बास! वैभवला घराबाहेर काढा!

Bigg Boss Marathi 5 Suraj Chavhan : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ५ सध्या खूपच गाजतोय. घरातल्या वाद, भांडणं, आणि दुसरीकडे दिसणारी मैत्री यामुळे प्रेक्षक या सीजनचा पुरेपूर आनंद घेत आहेत. यातल्या स्पर्धक आणि टिकटॉक स्टार सूरज चव्हाणने त्याच्या साध्या आणि मनमिळावू स्वभावाने सगळ्यांचं मन जिंकलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र सूरजला सपोर्ट करताना दिसतोय, ज्यामुळे तो घरातील एक महत्त्वाचा स्पर्धक ठरला आहे.

Jay Dudhane on Suraj Chavhan

१६ ऑगस्टला बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन्सी टास्क झाला. या टास्कमध्ये सूरजने उत्कृष्ट परफॉर्मन्स करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्याच्या खेळाचं सगळ्यांनी कौतुक केलं, कारण त्याने स्वतःची कमाल दाखवली. पण याच टास्कमध्ये अरबाज पटेल आणि वैभव चव्हाणवर टीका झाली. अरबाजने संपूर्ण ताकद वापरून सूरजला कॅप्टन्सी टास्कमधून बाहेर काढलं, आणि यामुळे प्रेक्षक त्याच्यावर नाराज झाले. अनेकांनी अरबाजच्या या वागण्यावर टीका केली.

Abhijet Bichukale in Bigg Boss Marathi :बिग बॉस च्या घरात अभिजित बिचुकले ची होणार इंट्री! राडा होणार..

यावर बिग बॉस मराठी सीजन ३ चा उपविजेता जय दुधानेनेही आपलं मत मांडलं. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सूरजचं कौतुक केलं आणि वैभववर टीका केली. जयने म्हटलं, “बिग बॉस वैभवला बाहेर काढा. अरबाजसाठी सूरजचं पुरेसा आहे.” जयच्या मते, वैभव बिग बॉसच्या घरात ज्या कारणासाठी आला होता, त्याच्या उलट वागत आहे.

जयने याआधीही निक्की तांबोळी आणि तिच्या ग्रुपच्या खेळावर टीका केली होती. सिनियर लोकांचा अपमान केल्यावरून जयने निक्कीला सुनावलं होतं, आणि त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी सपोर्ट केला होता.

Bigg Boss Update : आई कुठे काय करते मधील ही अभिनेत्री जाणार बिग बॉस मध्ये!

आता आजच्या भागात भाऊंच्या धक्क्यावर रितेश देशमुख अरबाज आणि वैभवला काही बोलणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रितेशची प्रतिक्रिया शोच्या पुढील घडामोडींवर परिणाम करू शकते. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी सीजन ५’ दररोज रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर कधीही पाहायला विसरू नका!

Leave a Comment

Exit mobile version