Bigg Boss Marathi 5 Ritesh Deshmukh: ‘भाऊच्या धक्क्या’वर जाणवली रितेश भाऊची कमतरता; अवघ्या महाराष्ट्राने केलं लाडक्या भावाला मिस!

Bigg Boss Marathi 5 Ritesh Deshmukh : ‘बिग बॉस मराठी’चा लयभारी खेळ काही दिवसांपासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक यांच्यामधील दुवा हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा सुपरस्टार रितेश देशमुख आहे. रितेश भाऊ आपल्या स्टाईलने हा खेळ रंगवत आहे. ‘भाऊच्या धक्क्या’वरील त्याच्या सादरीकरणाचं जगभरात भरभरून कौतुक होत आहे. पण या वीकेंडला मात्र व्यस्त चित्रीकरणामुळे त्याला ‘भाऊचा धक्का’ करता आला नाही. त्यामुळे रितेश भाऊची आठवण काढत हा भाऊचा धक्का पार पडला.

Bigg Boss Marathi 5 Ritesh Deshmukh

‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत ‘बिग बॉस मराठी’च्या घरातला कल्ला सुरू राहिला. शनिवारी पार पडलेल्या ‘महाराष्ट्राचा धक्का’ला महाराष्ट्रातील पत्रकारांनी तर रविवारी ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटातील कलाकार म्हणजेच सुप्रिया पिळगांवकर, स्वप्निल जोशी आणि अभिनयसम्राट अशोक सराफ यांनी हजेरी लावली. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात गेलेल्या या सर्वच कलाकारांना रितेशची खूप आठवण आली.

Bigg Boss Marathi 5 Arbaaj Patel : अरबाजच्या एलिमिनेशन वर मराठी अभिनेत्याची अजब पोस्ट, सगळीकडे चर्चांना उधाण..

रितेशने ‘भाऊचा धक्का’ एका वेगळ्या उंचीवर नेला आहे. दिवसेंदिवस तो हा ‘भाऊचा धक्का’ चांगलाच गाजवत आहे. रेकॉर्ड्स ब्रेक करण्यासह महाराष्ट्रातील घराघरांतील प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करण्यात रितेश भाऊ यशस्वी झाला आहे. ‘बिग बॉस मराठी’ला त्याने नव्या ढंगात, नव्या रुपात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं आहे.

Bigg Boss Marathi Arbaz Patel :अरबाजच्या निक्की सोबतच्या जास्त जवळीक मुळे..अरबाज च्या जुन्या गर्लफ्रेंड ने घेतला जा निर्णय!

रितेशमुळे यंदाचा सीझन खूप हटके ठरतोय. सीझनला अधिक टवटवीत आणि तरुण करण्यात त्याचा महत्त्वाचा हातभार लागत आहे. परिस्थितीनुसार रितेश भाऊ कधी कोणत्या सदस्याचा मित्र होतो तर कधी कोणाचा गुरू, कोणासोबत ग्रॅण्ड मस्ती करतो तर कोणासोबत लय भारी दोस्ती. कोणाचं काही चुकलं तर त्यांची शाळाही घेतो तर कोणाची पाठही थोपटतो, कधी शाबासकीही देतो. रितेश भाऊच्या या अनोख्या अंदाजाचं ‘बिग बॉस’ प्रेमी प्रशंसा करताना दिसून येत आहेत.

Bigg Boss Marathi 5 Ritesh Deshmukh Comments

Leave a Comment

Exit mobile version