बिग बॉस मराठी फेम अभिजीत केळकर यांना कोरोनाची लागण.

सध्या जगभरात कोरोनामुळे सर्वजण हतबल झाले आहेत. करोनाच्या कचाट्यातून कोणीही सुटलेले नाही. मोठ मोठ्या कलाकारांना, क्रिकेटपटूंना, राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. यातच अशी अशी न्यूज आली आहे की सुप्रसिद्ध मराठी अभिनेते आणि बिग बॉस फेम अभिजीत केळकर यांना देखील कोरोना ची लागण झाली आहे.

अभिजीत केळकर यांनी आपल्या सोशल मीडिया वर याबद्दल ची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या instagram अकाऊंट फोटो पोस्ट करत caption मध्ये लिहिल की “नमस्कार, सर्व प्रकारची काळजी घेऊनही मला कोरोना ची लागण झाली… माझी फक्त पाठ दुखत होती ह्या व्यतिरिक्त मला आणखी काहीही होत नव्हतं किंवा सर्दी,खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणही नव्हती… डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी टेस्ट करून घ्यायला सांगितली जी पॉझिटिव्ह आली… त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी व्यवस्थित ट्रीटमेंट घेत आहे आणि आता माझी तब्येत उत्तम आहे… माझी बायको तृप्ती आणि राधा- मल्हार सगळे ठणठणीत आहेत… तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच कायम पाठीशी असू देत धन्यवाद…”

अभिजीत केळकर सोनी मराठी वाहिनीच्या singing superstar या शो मध्ये ते आपल्याला गाताना दिसत आहेत. त्याशिवाय बिग बॉस मराठी सीजन 2 देखील त्यांनी गाजवला. अभिजीत केळकर यांचे सर्व चाहते पोस्ट खाली कमेन्ट करत तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल अश्या कमेन्ट करत आहेत. तर मित्रांनो यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Tags: Abhijeet Kelkar Corona Positive

1 thought on “बिग बॉस मराठी फेम अभिजीत केळकर यांना कोरोनाची लागण.”

  1. एक सांगायचे आहे, क्षमा करा, पण एक गोष्ट इकडे पोस्ट करतोय, पण ही गोष्ट महत्वाची आहे म्हणून पोस्ट करतोय. हे माझे मनोगत आहे.

    आता मराठी माणसाने प्रत्येक मराठी माणसाला पुढाकार द्यावा आणि एक साथ हातात हात घालून पुढे जाऊया, लहान लहान गोष्टींवरून भांडून काही फायदा होणार नाही, हीच आताची काळाची गरज आहे, प्रत्येक मराठी माणसाला त्याची चुक कळली असेलच, आताची जी परिस्थिती आहे त्यावरून आपली चूक सुधारा, आणि पुढे चला. आपण एकजूट होऊन आपल्या मराठी आणि महाराष्ट्रीय culture ला अजरामर करूयात. लोक आपल्या एका चुकी मुळे फायदा घेतात, आपल्याला आता सर्वांना समजून घायवे लागेल, समजावे लागेल आणि आपली मराठी अस्मिता जागृत ठेवावी लागेल आणि जास्त जोशाने एकमेकांना support करून उभे करावे लागेल. हा भगवा असाच खाली पडू देऊ नका, दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ होऊ देऊ नका, प्रत्येक मराठी माणसाला जपा, सांभाळा आणि उभे रहा, कारण वेळ सध्या खूप वाईट आहे, आता तरी मोठा व्यापक विचार करा आणि आलेल्या संकटातून लवकर सुटका होऊ देत. मी कुठलेही प्रवचन देत नाही, पण परिस्थितीचे गांभीर्य समजून घेणे आणि Maturity आता असलीच पाहिजे, धोके, संकटे मोठे आहेत, पण एकजूट राहू तर नक्की आपण ह्यातून तरून जाऊ, लक्षात असू देत आपली एकजूट ताकद हीच आपली मराठी अस्मिता, मी कोणी लीडर नाही, पण आता प्रत्येकाने हि leader-ship संभाळायची खूप, अति दक्षतेने घेणे, हीच काळाची गरज आहे, फक्त गाफील आणि मूर्ख राहू नका, छत्रपतींनी आपल्याला खूप शहाणपण नक्की शिकवले आहेत, सर्व चरित्र खरंच वाचा वेळ असेल तर, आणि अंमलबजावणी करूयात. मराठी एकटा नव्हे, मराठी एकता हीच आपली ताकद वाढवेल, लवकर एकजूट होऊयात, क्षमा करा अशी पोस्ट आपल्याला चुकीची वाटत असेल, पण परिस्थिती नुसार बदल आणि मोठा बदलावं हे येणे गरजेचे आहे. कोणी ह्या पेक्षा सर्वांनी, हेच महत्वाचे आहे. ती जुनी राख बाजूला करा, आणि नवीन महाराष्ट्रीय सुरुवात करूयात. पटले असेल तर हीच गोष्ट, जगातील प्रत्येक मराठी माणसा पर्यंत पाठवायची जबाबदारी आपलीच आहे असे समजून उभे रहा, social media platform हा एक मोठ साधन होऊ शकते. कृपया समजून घ्या, वाद करू नका, वाढवू नका, भांडणात आयुष्य गेलंय, आता maturity ठेवून पुढाकाराला साथ द्या.।। जय हिंद, जय महाराष्ट्र ।। मला ह्यात मोठं नाही व्हायचे आहे, पण प्रत्येक मराठी माणसाने जग भर मोठे व्हावे, हीच एक vision आहे, जी छत्रपतींनी पाहिली ह्याला एक नवीन आकार देऊन एकजूट होऊन पुढे जाऊयात.

    मराठी म्हणजे ब्राम्हण ते दलित ह्या सर्वांना समाविष्ट करून घेणारा त्यांना जवळ आणणारा एक दुवा, म्हणा, एक अस्मिता म्हणा, आपण सर्व ह्यात आहोत. तुमचा आमचा हा दृष्टिकोन बदलला की सर्व स्वछ दिसेल, पण ज्याचे डोळे पिवळे आहेत, त्याला दिसणार जग हे पिवळे असेल, म्हणून ही जात पात आणि धर्म नावाची कावीळ निघाली पाहिजे, आणि ती कावीळ आता आपल्याला प्रत्येकाच्या हृदयात घुसून काढणे गरजेचे आहे.

    *सूचना: मराठी म्हणजे सर्व धर्मीय, जात-ब्राम्हण ते दलित, आणि सर्व जन जे महाराष्ट्रीय संस्कृतीला मान देतात, ते सर्व आलेच आणि आपल्या सर्वां मध्ये बंधुभाव प्रसारित करणे हा होय.*

    आणखी एक गोष्ट येथे नमूद करावीशी वाटते, आपण सर्व आगरी, कुणबी, मालवणी, कोळी, मराठा, वडारी, भंडारी, आणखी खूप भाषा बोलत असाल, आपण सर्व असे वाटलो गेलो आहोत. कोणी म्हणतो जय आगरी, जय कुणबी, जय कोळी, जय वडारी, जय भंडारी किंवा आणखी कोणत्या हि जाती नुसार आपण आपला जय करतोच. आपण हे लक्षात का घेतं नाही, कि आपल्याला लिहिण्यासाठी मराठीच वापरावी लागते, म्हणून आपला जय आणि समाजाचे नाव घेण्याच्या आधी आपण मराठी आणि महाराष्ट्रीय आहोत, हेच त्रिवार सत्य आहे.
    साधी गोष्ट आपण रोजचा पेपर कुठला वाचतो, तो म्हणजे मराठीच न.
    म्हणून समाजाचा आदर ठेवा, पण मराठी आणि महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान ठेवा, कारण आपली संपूर्ण पिढी, आणि येणारी पिढी आपल्याकडुन हाच वारसा पुढे सुरु ठेवणारी आहे.
    *।।जय महाराष्ट्र, जय मराठी।।*🚩🚩🚩🚩🚩

    आपण सर्व मराठी म्हणून खूप गरजेची आहे, जर वाटली महत्वाची, तर नक्की पुढे पाठवावी. वेळ खूप वाईट आहे, आणखी वाईट परिस्थिती येऊ देऊ नका, एकजूट व्हा, तुटू नका सर्वांना जोडायचे काम करा. आणि social media चा योग्य वापर करावा.🙏🚩

    Reply

Leave a Comment

Exit mobile version