बिग बॉस फेम अभिनेता विकास पाटील दिसणार ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या मालिकेत..

स्टार प्रवाह वरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रेक्षकांना खुप आवडते.काही दिवसांपासून या मालिकेने एक वेगळ वळण घेतलं आहे. यामुळे काही प्रेक्षक नाराज आहे तर काहींना हा ट्रॅक आवडतोय. गौरी आणि जयदीपच्या जोडीला अगदी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची पसंती मिळतेय.

आता या मालिकेत आणखीन एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. एका नवीन कलाकाराची एंट्री या मालिकेत होणार आहे. हा कलाकार अगदी सगळ्यांचाच आवडता आणि जवळचा आहे. बिग बॉसच्या घरातील सगळ्यांचा लाडका हा कलाकार आहे. अभिनेता विकास पाटील हे त्याच नाव. विकास आता ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत एक नवीन भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता विकासचं पात्र या मालिकेत कसं असणार? तो गौरीच्या बाजूने येणार की शालिनीच्या हे पाहणं खुप उत्सुकतेच असणार आहे.

विकास पाटील या आधी बऱ्याच मालिकेंमधून आपल्या भेटीला आला होता. कलर्स मराठी वरील ‘बायको अश्शी हवी’ आणि ‘मराठी बिग बॉस’ मधून तो घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनामनात पोहोचला.
तर अभिनेता विकास पाटील याला ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत बघण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ? ही कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा.

Leave a Comment

Exit mobile version