महाराष्ट्राची शान असलेला फलंदाज ऋतुराज गायकवाड अडकला विवाह बंधनात! सायली संजीवने दिल्या विवाहित जोडप्याला शुभेच्छा!

फलंदाज ऋतुराज गायकवाड याच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडिया वर चांगल्याच रंगल्या होत्या. पण ही चर्चा खरी उतरली आहे. Finally, ऋतुराज गायकवाड विवाह बंधनात अडकला आहे. त्याने उत्कर्षा पवार हीच्या सोबत लग्नाची रेशीमगाठ बांधली आहे. ऋतुराज आणि उत्कर्षा यांनी महाबळेश्वर येथे 3 जुन, शनिवारी विवाह केला. ऋतुराजने त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे सुंदर आणि खास फोटो शेअर करून चाहत्यांना ही बातमी दिली आहे. त्याला प्रेक्षकांनी तसेच Indian Cricketers यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. या नवविवाहित जोडप्याला त्याच्या चाहत्यांनी खुप साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

ऋतुराज आणि उत्कर्षा यांनी महाराष्ट्रियन पद्धतीने लग्न केले असून, दोघेही लग्नात खूपच छान दिसत होते. त्या दोघांनी White कलरचा छान असा ड्रेस परिधान केला होता. उत्कर्षाने Lehenga परिधान केला होता, तर ऋतुराजने मस्त अशी शेरवानी परिधान केली होती. दोघांनीही विधीला Green कलर Prefer केला होता. उत्कर्षाने मस्त अशी पैठणी परिधान केली होती तर ऋतुराजने White and Green शेरवानी परिधान केली होती.

कही दिवसांपूर्वी आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने आपल्या नावी आयपीयलची ट्रॉफी केली. चेन्नईने विजय मिळवत गुजरात टायटन्स यांना हरवले. चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. ऋतुराजने या विजयामध्ये खुप चांगली कामगिरी केली आहे. आयपीएल झाल्यानंतर तो विवाह बंधनात अडकला आहे. नुकतेच त्याचे मेहंदीचे फोटो व्हायरल झाले होते. यावरून प्रेक्षकांनी कयास काढला तो लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.

ऋतुराज हा एक उत्तम फलंदाज आहे. तो Opener Batsman आहे. त्याची इंडियन टीमसाठी चांगली कामगिरी सर्वांना माहीत आहे. त्याची पत्नी उत्कर्षा ही देखील Cricketer आहे. ती फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीही करते. उत्कर्षा महाराष्ट्र संघाकडून खेळते. ती 24 वर्षांची आहे, तर ऋतुराज हा 26 वर्षांचा आहे. उत्कर्षा ही पुण्याची राहणारी असून, इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशन अँड फिटनेस सायंसेस मध्ये तिने शिक्षण घेतले आहे. ऋतुराजच्या लग्नाला csk संघातील खेळाडू शिवम दुबे आणि त्याची पत्नी अंजूम खान देखील उपस्थित होते. शिवमने त्याच्या सोशल मीडिया वर फोटो शेअर करून या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी ऋतुराजने उत्कर्षा आणि महेंद्र सिंग धोनी यांच्या सोबत फोटो पोस्ट करत 2 VVIPs of my Life असे कॅप्शन लिहीत उत्कर्षाविषयी त्याच्या चाहत्यांना कळवले होते. आयपीएल 2023 ची ट्रॉफी हातात घेऊन उत्कर्षा आणि ऋतुराजने फोटो काढला होता. तो फोटो ऋतुराजने सोशल मीडिया वर देखील शेअर केला होता.

या आठवड्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी ऋतुराजची निवड करण्यात आली होती. परंतु,ऋतुराजने लग्नासाठी ब्रेक घेतलाय. त्याचे नाव टीम इंडियाच्या राखीव यादीत होते. या सुंदर आणि नवविवाहित जोडप्याला लग्नाच्या खुप साऱ्या शुभेच्छा!

Leave a Comment

Exit mobile version