बालक पालक फेम अभिनेता रोहित फाळके याचा साखरपुडा संपन्न

अभिनेता, लेखक आणि  दिग्दर्शक रोहित फाळके याचा साखरपुडा समारंभ नुकताच पार पडला आहे. रोहितच्या होणाऱ्या पत्नीचे नाव रचना मुळे असे आहे. रोहितने त्याच्या सोशिअल मेडिया अकॉउंटवर त्याच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत ही गोड बातमी चाहत्यासोबत शेयर केली आहे. रोहित आणि त्याची होणारी पत्नी देखील मनोरंजन क्षेत्रातच कार्यरत आहेत. काल दिनांक १० ऑक्टोबर २०२० रोजी त्यांच्या साखरपुढा एकदम साध्या रीतीने पार पडला. लग्नाची तारीख अजून ठरली नसून ते लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.

अभिनेता रोहित फाळकेने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. रोहितने २०१२ मध्ये ‘बालक पालक’ या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटामुळे रोहितला खूप प्रसिद्धी मिळाली. रोहितने  बालक पालक, पांघरून, लव्ह लफडे, स्ट्रॉबेरी शेक, मांजा या मराठी चित्रपटांमध्ये अभिनय साकारला आहे. तसेच ‘दादू’ या मराठी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन त्याने केले आहे. रोहितने स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘बे दुणे दहा’ या मालिकेत देखील काम केले आहे.

AtoZ Marathi Team कडून रोहित आणि रचना यांचे खूप खूप अभिनंदन.  

Tags: Rohit Phalke Engagement, Rohit Phalke Wife

Leave a Comment

Exit mobile version