बालक पालक फेम अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर लग्न बंधनात अडकली

बालक पालक फेम अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर हिचे लग्न फोटोग्राफर राजेश करमारकर यांच्या सोबत झाले आहे. काही दिवसांपूर्वीच तिने होणाऱ्या नवऱ्यासोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचे सांगितले होते. राजेश करमारकर हा प्रसिद्ध फोटोग्राफर असून त्याने खूप साऱ्या मराठी कलाकारांचे फोटोशूट केले आहे. काही मोजक्या पाहुण्यांच्या आणि मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.

दिग्दर्शक रवी जाधव यांच्या बालक पालक या चित्रपटात शाश्वतीने डॉली ही महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धम्माल गाजवली होती. हा चित्रपट करताना ती नववीत शिकत होती. बालक पालक हा शाश्वतीचा पाहिलाच चित्रपट. हा चित्रपट तिच्या आयुष्यातील Turning Point ठरला.

शाश्वतीचा जन्म पुण्यात झाला असून ती लहाणाची मोठी देखील पुण्यातच झाली. बालपणापासूनच तिने नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. बालक पालक चित्रपटानंतर नंतर तिने अनेक मराठी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. तर मित्रांनो शाश्वती पिंपळीकर आणि राजेश करमारकर यांची जोडी तुम्हाला कशी वाटली ते कमेन्ट करून नक्की सांगा.

Tags: Shashwati Pimplikar Marriage, Shashwati Pimplikar Marriage, Shashwati Pimplikar Lagn, Shashwati Pimplikar Husband, Shashwati Pimplikar and Rajesh Karmarkar Wedding, Shashwati Pimplikar and Rajesh Karmarkar Marriage Photo

Leave a Comment

Exit mobile version