प्रेक्षकांना भावते माऊ आणि सिद्धांतची जोडी

सध्या स्टार प्रवाह वरील सगळ्यांच मालिका खुपच सुपरहिट ठरत आहे. पण त्यात प्रेक्षक ‘मुलगी झाली हो’ या मालिकेला जास्त प्रतिसाद देताना दिसून येतय. सध्या ही मालिका trp च्या यादीत अव्वल स्थानावर आहे . मालिकेत चाललेल्या सध्याच्या ट्रॅकमुळे या  मालिकेला प्रेक्षकांची खुपच पसंती मिळत आहे. या मालिकेला सध्या जरा भावनिक वळण मिळाले आहे. अखेर विलासने माऊचा मुलगी म्हणून स्वीकार केलेला दिसून येतोय. लक्ष्मीच्या पावलांनी माऊचा गृहप्रवेश होताना आपण सर्वांनीच पहिले आहे. विलासने तर माऊला स्वीकारले पण आता शौनक काय करणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय.

माऊ आणि शौनक यांच्यातील गैरसमजुतीमुळे  त्यांच्यात दुरावा वाढताना आपण पहिल आहे. त्यात अजुन राजन सरदेशमुख प्रकरणाची भर पडली. आणी ACP सिद्धांतची एंट्री झाली . सिद्धांतने माऊवरचे आरोप खोटे ठरवत तिची जेल मधून सुटका केली . त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात सिद्धांत बद्दल जरा आपुलकी निर्माण झाली आहे.  

प्रेक्षकांना आधी माऊ आणि शौनक ची जोडी खुप आवडत होती परंतु ACP सिद्धांत भोसलेच्या येण्याने हे  सगळचं बदलून गेलय प्रेक्षक चक्क आता सिद्धांत आणि माऊ च्या जोडीला पसंती देताना दिसत आहे. त्यांची सोशल मीडियावर व्हिडिओ द्वारे चालणारी मज्जा, मस्ती पाहून प्रेक्षक देखील त्यांना प्रतिसाद देत आहेत.

तर मग काय वाटत तुम्हांला शौनक आणि माऊ यांच्यात आलेला दुरावा जाऊन, त्यांचं नातं होईल का पुन्हा पाहिल्यासारख ? हे आम्हांला कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा

 

Leave a Comment

Exit mobile version