झी मराठी वरील ‘तू चालं पुढं’ या मालिकेतील अश्विनी बद्दल बरंच काही…

झी मराठी वरील सगळ्यांची आवडती ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. आणि या जागी ‘तू चालं पुढं’ ही नवी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री दीपा परब मुख्य भूमिकेत दिसून येतेय. अभिनेत्री दीपा परब म्हणजे दीपा अंकुश चौधरी. तब्बल 14 वर्षांनी ही अभिनेत्री ‘तू चाल पुढं’ या मालिकेतून कमबॅक करणार आहे.


अभिनेत्री दीपा परबने मराठा बटालीयन, चकवा, लगण, क्षण, कथा तिच्या लग्नाची, मुलगा,नटरंग, उरूस अश्या चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तसेच अभिनेता अंकुश चौधरी आणि दीपा परब यांनी ‘ऑल द बेस्ट’ या मराठी नाटकात एकत्र काम केले होते. या नाटकासोबतच अनेक नाटकांमध्ये दीपाने काम केले आहे. मराठी सोबतच ‘बॉम्बे मेरी जान, छोटी मा,थोडी खुशी थोडी गम, मित, शौर्य और अनोखी की कहाणी, या हिंदी मालिकांमध्ये देखील अभिनेत्री दीपा परब ने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

आणि आता दीपा परब आपल्याला ‘तू चालं पुढं’ या मालिकेत अश्विनीची भूमिका साकारताना दिसत आहे.

Leave a Comment

Exit mobile version