अभिनेता आरोह वेलणकर बद्दल बरंच काही.

Aroh Welankar Biography, Wiki, Birthday, Age, Wife, Qualification, Family, Movies, Serials

झी मराठी वाहिनीवरील ‘लाडाची मी लेक ग’ या नव्याने सुरू झालेल्या मालिकेत अभिनेता आरोह वेलणकर डॉक्टर सौरभ ही प्रमुख भूमिका साकारत आहे. तर सुप्रसिद्ध अभिनेत्री मिताली मयेकर ‘कस्तुरी’ ही प्रमुख भूमिका साकारत आहे. कस्तुरी आणि सौरभ यांच्या प्रेमकथेवर आधारित या मालिकेने अगदी काही दिवसांत प्रेक्षकांची मने जिंकली. तर आज आपण अभिनेता आरोह वेलणकर याच्या बद्दल जाणून घेणार आहोत.

अभिनेता आरोह वेलणकर हा मूळचा पुण्याचा. पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात आरोहचं बालपण गेलं. आरोहचा जन्म १४ नोव्हेंबर १९८९ रोजी, पुण्यात झाला असून त्याचे शालेय शिक्षण करनाटका हायस्कूल येथून पूर्ण झाले आहे. आरोहने MIT college of engg Pune येथून त्याची इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. कॉलेज मध्ये असताना आरोह अनेक एकांकिांमध्ये  सहभागी व्हायचा.

अभिजीत पानसे दिग्दर्शित ‘रेगे’ या मराठी चित्रपटातून आरोहने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.  रेगे हा त्याचा पहिलाच मराठी चित्रपट. रेगे या चित्रपटासाठी आरोहला दादासाहेब फाळके पुरस्कार देखील मिळाला होता. त्याच्या अभिनय कौशल्यामुळे त्याला ‘घंटा’ या मराठी चित्रपटात काम मिळाले.

यानंतर ‘बिग बॉस’ मराठीच्या दुसर्‍या पर्वातील धमाकेदार वाईल्ड कार्ड एण्ट्रीमुळे आरोह कायमच चर्चेत राहिला. आरोह ‘बिग बॉस मराठी २’ मधील टाॅप ५ स्पर्धकांपैकी एक स्पर्धक होता.

अभिनया व्यतिरिक्त आरोहला समाजकार्याची आवड आहे. आरोह अनेक सामाजिक संस्थांबरोबर संलग्न आहे. ‘आय व्होट’ सारख्या वेगवेगळ्या जनजागृती मोहिमांमध्ये तो सहभागी झाला आहे. दिव्यांगांसाठीही तो काम करत असतो.

आरोहचा प्रेमविवाह झाला असून ११ डिसेंबर २०१७ रोजी अभिनेता आरोह वेलणकर त्याच्या गर्लफ्रेंड अंकिता शिंघवीसोबत विवाह बंधनात अडकला. आरोहची पत्नी अंकिता ही मारवाडी आहे. MIT college मध्ये दोघांची भेट झाली. त्याचदरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

आत्ता तो लाडाची मी लेक ग या मालिकेत डॉक्टर सौरभची प्रमुख भूमिका साकारत आहे. तर मित्रांनो या मालिकेतील सौरभ आणि कस्तूरी यांची जोडी तुम्हाला आवडली असेल तर ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Tags: Aroh Welankar Biography, Aroh Welankar Wiki, Aroh Welankar Birthday, Aroh Welankar Age, Aroh Welankar Family, Aroh Aelankar Wife, Aroh welankar Qualification, Aroh Welankar Height, Aroh Welankar Movies, Aroh Welankar Serials

Leave a Comment

Exit mobile version