प्रेमाची गोष्ट या नव्या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर साकारणार महत्वपूर्ण भूमिका !

स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आली आहे. या वाहिनीवरील सर्वच मालिका लोकप्रिय असून, प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहेत. काही मालिका चांगले कथानक असून देखील प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेतात. त्याजागी नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात. स्टार प्रवाह वरील रंग माझा वेगळा ही मालिका टॉप पाचमध्ये असूनही लवकरचं प्रेक्षकांचा निरोप देखील घेणार आहे. त्याजागी दररोज रात्री ८:०० वा. प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

प्रेमाची गोष्ट या मालिकेचे प्रोमो ही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. अभिनेत्री तेजश्री प्रधान, अभिनेता राज हंचनाळे आणि बालकलाकार इरा परवडे हे मुख्य भूमिका साकारणार आहेत. मालिकेचा आणखी एक प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर मुख्य भूमिका साकारणार आहे. अपूर्वाचे मालिकेतील नाव सावणी असे आहे. सावणी ही सागरची पत्नी होती असे मालिकेत दाखवण्यात आले आहे. सई ही सावणी आणि सागरची मुलगी असून, सईचा सांभाळ सागर करतोय असे मालिकेच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे. सईची कस्टडी मी मिळवणारचं असे चॅलेंज देखील सावणीने सागरला केले आहे.

मालिका खूपच मनोरंजक ठरणार असून, कथानक देखील खुप छान आहे. अपूर्वा आपल्याला बिग बॉस मराठी ४ नंतर रावरंभा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती. ती बिग बॉस मराठी ४ ची फस्ट रनर अप होती. अपूर्वाने रात्रीस खेळ चाले, तू माझा सांगाती, स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेत उत्तम अभिनय केले असून, भाकरखाडी – ७ कि. मी. आणि रावरंभा या चित्रपटात देखील तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

तुम्ही प्रेमाची गोष्ट या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला मुख्य भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहात का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version