अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने फेसबूक पोस्ट द्वारे चॅनल तसेच प्रॉडक्शन हाऊसवर केले गंभीर आरोप

झी मराठी वाहिनी वरील गाजलेली ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंता हे पात्र साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने यापुढे मालिकेत काम न करण्याचा निर्णय घेतलाय. रात्रीस खेळ चाले भाग ३ मध्ये सुद्धा अपूर्वा काही भागांमध्ये दिसून आली परंतु तिच्या अचानक एक्जिट ने चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. अपूर्वाने फेसबूकवर पोस्ट करून तिची बाजू मांडत चॅनल तसेच प्रॉडक्शन हाऊसवर गंभीर आरोप केले आहे. ज्य भूमिकेसाठी मी १० किलो वजन वाढवल त्यावरून मला खुप negative बोलण्यात आले तसेच ज्येष्ठ कलाकारांनी आणि काही नावख्यांनी देखील मझी खिल्ली उडवली याप्रकरचे अनेक आरोप तिने केले आहेत.

तसेच तीने इनस्टाग्रामवर केलेल्या पोस्ट मध्ये म्हंटलं आहे कि, प्रिय चाहते , माझ्यावर झालेल्या अन्याया विरोधात मी माझी भूमिका सोशल मीडिया मधून मांडली . आपण दिलेल्या प्रतिसादाने मी भारावून गेले . एवढ्या प्रचंड संख्येने माझे चाहते माझ्यावर एवढं प्रेम करतात , हे पाहून मी थक्क झाले , त्याबद्दल सर्वांचे आभार मानंन्यास शब्द अपुरे पडत आहेत .. एक कलाकार , घडतो त्याच्या चाहत्या मुळे . एक कलाकृती घडते ती कलाकारांच्या अभिनयाने आणि प्रामाणिक प्रयत्नाने , शेवंता सुद्धा त्याचेच एक उदाहरणं आहे . आपण सोशल मीडिया व प्रत्यक्ष फोनवरून दिलेला पाठिंबा व शुभेच्छा माझ्यासाठी लाखमोलाच्याच आहेत . त्यातून किती प्रसिद्धी मिळवली , त्यापेक्षा किती माणसं आपल्याशी जोडली गेली हे महत्वाचे आहे आज खऱ्या अर्थाने लक्षात आलं की माझ्या आयुष्यातील माणसांची गणती अगणित आहे . आणि हिच माझी आजवरची खरी कमाई , खरी ताकत आहे . तुमच प्रेम हिच माझी प्रेरणा आहे .. या सर्व प्रकारामुळे माझ्या मनाच खच्चीकरण झालं होतं . तुमच्या प्रेमाच्या वर्षावाने पुन्हा नव्या उमेदीने आणि ताकदीने उभे राहण्याची ऊर्जा मला मिळतं आहे . जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी विविध भूमिकेतुन तुमच्या समोर सादर होईन . तुमच असंच प्रेम माझ्यावर राहील , हीच ईश्वरचरणी प्रार्थना ….. आपले सर्वांचे खूप खूप मनपूर्वक आभार  

तर यासगळ्यावर तुमच काय मत आहे , तुम्ही अपूर्वाला मालिकेत मिस करता का? हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.  

Leave a Comment

Exit mobile version