रात्रीस खेळ चाले मालिकेसाठी अपूर्वाने सोडली तुझ माझ जमतय मालिका?

झी युवा वाहिनीवरील तुझ माझ जमतय ही मालिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. परंतु या मालिकेत आपल्याला काही बदल पाहायला मिळतील. या मालिकेत पम्मीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने मालिका सोडल्याची बातमी समोर आली आहे. आत्ता या पम्मीची भूमिका देवमाणूस फेम अभिनेत्री प्रतीक्षा जाधव साकारणार असल्याचे कळत आहे.

काही मीडिया रीपोर्ट नुसार अपूर्वाने ही मालिका वैयक्तिक कारणामुळे सोडल्याचे सांगितले जात आहे, तर काही मीडिया रीपोर्टनुसार अपूर्वा ने ही मालिका रात्रीस खेळ चाले सीजन ३ साठी सोडल्याचे बोलले जात आहे. या मालिकेतील पम्मीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. आत्ता तिच्या जागी अभिनेत्री प्रतीक्षा जाधव पम्मीची भूमिका साकारणार आहे.

अभिनेत्री प्रतीक्षा जाधव हिने नुकतेच देवमाणूस या मालिकेतून निरोप घेतला. या मालिकेत तिने मंजुळा हे पात्र साकरलं होतं. या मालिकेतील मंजुळा हे पात्र प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरलं होतं. आत्ता ती लवकरच आपल्याला झी युवा वाहिनीवरील तुझ माझ जमतय या मालिकेत दिसणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला अपूर्वा नेमळेकर हिला पम्मीच्या भूमिकेत पाहायला आवडत की अभिनेत्री प्रतीक्षा जाधव हिला पम्मीच्या भूमिकेत पाहायला आवडेल ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा!

Tags: Apurva Nemlekar left Tuz Maz Jamtay serial for Ratris khel chale season 3, apurva nemlekar in ratris khel chale 3, apurva nemlekar new serial

Leave a Comment

Exit mobile version